मोठी बातमी! भाविकांच्या वाहनावर काळाचा घाला, पिकअप वाहन विहिरीत पडले; 14 जणांचा मृत्यू

सोलापूर : जिल्ह्यातील पंढरपुरात मोठी अपघात घडली असून एका विहिरीत पिकअप पडल्याने 14 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पंढरपूर तालुक्यातील म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत पडून मोठा अपघात झाला. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून सर्वजण पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी असल्याचे समजते. विहिरीतून क्रेनद्वारे सुरुवातीला पिकअप जीप बाहेर काढली जाईल, त्यानंतर विहिरीत उतरून मृतदेह बाहेर काढले जातील, अशी माहिती आहे.

म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी भाविक आले असताना येथील विहिरीत त्यांचे पिकअप वाहन पडले. गावाकडे परत येत असताना माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी गावानजीक एका विहिरीत पिकअप गाडी पडल्याने ही दुर्घटना घडली. त्यानंतर, स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. मात्र, वाहनातील भाविकांची मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनास्थळावर परिस्थिती भीषण असून पिकअपमधील सर्वच भाविक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचलं आहे. अग्निशामक दलाची यंत्रणा बोलावली आहे. प्रांताधिकारी, जिल्हा प्रशासनाची टीम रवाना झाली आहे. विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु झालं आहे.

दरम्यान, येथील विहिरीजवळ यापूर्वी अपघात झालेले नाहीत. यापूर्वी इथं अपघात झाला नव्हता. हा पहिलाच अपघात असल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा

रोहित पवारांचे कुटुंबीय भावूक; आईने हात जोडले, पंढरपुरात वडिलांचे हाल पाहून मुलांचे डोळे पाणावले

Comments are closed.