‘ऑपरेशन टायगर’ अन् ओमराजेंचे मौन! शिवसेना पक्षप्रवेशाचा सस्पेन्स आता ‘त्या’ ऐतिहासिक निकालावर
धाराशिव: शिवसेनेच्या (शिंदे गट) ‘ऑपरेशन टायगर’मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्याही नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. या संभाव्य पक्षप्रवेशाच्या चर्चांवर ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी सध्या सूचक मौन बाळगले आहे. ते सध्या नेमके पुण्यात आहेत की दिल्लीत, याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात असून त्यांची भूमिका अजूनही अस्पष्ट आहे.(Omraje Nimbalkar)
Omraje Nimbalkar: गोवर्धनवाडी निवासस्थान आणि कार्यालयात शुकशुकाट
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठ दिवसांपासून ओमराजे निंबाळकर हे कौटुंबिक कारणास्तव पुण्यात असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. मात्र, ते अजूनही धाराशिवमध्ये परतलेले नाहीत. धाराशिवमधील त्यांचे गोवर्धनवाडी येथील निवासस्थान आणि मुख्य कार्यालय या दोन्ही ठिकाणी सध्या शुकशुकाट पाहायला मिळत आहे. एरवी सकाळी ९ वाजल्यापासून त्यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची नियमितपणे मोठी गर्दी असते, मात्र सध्या तिथे शुकशुकाट आहे.(Omraje Nimbalkar)
Omraje Nimbalkar: मुंबईतील सुनावणीनंतर कॅमेऱ्यापासून अंतर
पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाच्या सुनावणीसाठी ओमराजे निंबाळकर हे शेवटचे मुंबईत आले होते, तेव्हा ते कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्यानंतर त्यांनी आपण पुण्यात असल्याचे सांगितले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांनी माध्यमांच्या कॅमेऱ्यापासून पूर्णपणे अंतर ठेवले आहे. त्यांचे हेच कॅमेऱ्यापासून दूर राहणे सध्या राजकीय संभ्रम निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे ते नक्की पुण्यात आहेत की दिल्लीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Omraje Nimbalkar: “मी उद्धव ठाकरेंसोबतच…” ओमराजेंचा दावा, पण संशय कायम
पक्षप्रवेशाच्या या सर्व चर्चांवर यापूर्वी ओमराजे निंबाळकर यांनी नेहमीच आक्रमक आणि ठोसपणे आपली भूमिका मांडली आहे. “मी कोणताही पक्षप्रवेश करणार नाही, मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार,” अशी त्यांची कायमची अधिकृत भूमिका राहिलेली आहे.
काल रात्री उशिरापर्यंत त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आजही “मी असा कोणताही निर्णय (पक्ष बदलाचा) घेतलेला नाही,” असे स्पष्ट केले आहे. मात्र, एकीकडे ते या चर्चा नाकारत असताना, दुसरीकडे माध्यमांसमोर येण्याचे टाळत असल्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर ओमराजे निंबाळकर यांची पुढील भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक असणार आहे.
Omraje Nimbalkar: पवनराजे हत्याकांड प्रकरणाच्या निकालानंतरच पुढील दिशा ठरवणार
तर मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना पक्षप्रवेशाबाबत ओमराजे निंबाळकर तूर्तास कोणताही निर्णय घेणार नाहीत, ओमराजेंचे वडील पवनराजे हत्याकांड प्रकरणाच्या निकालानंतरच पुढील दिशा ठरवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या निकालाची तारीख लांबल्याने ओमराजे निंबाळकर यांचाही कोणताही निर्णय नाही शिवसेना पक्षप्रवेशाचा निर्णय निकालावरच अवलंबून असल्याची माहिती आहे.
Shivsena news: ठाकरेंच्या नऊ खासदारांची नावे
1. अनिल देसाई
2. अरविंद सावंत
3. संजय दिना पाटील
4. राजाभाऊ वाजे
5. संजय जाधव
6. संजय देशमुख
7. नागेश पाटील आष्टीकर
8. ओमराजे निंबाळकर
9. भाऊसाहेब वाकचौरे
Shivsena UBT MPs: कोणते खासदार शिंदे गटाच्या वाटेवर?
1. संजय जाधव
2. संजय देशमुख
3. नागेश पाटील आष्टीकर
4. ओमराजे निंबाळकर
5. भाऊसाहेब वाकचौरे
6. संजय दिना पाटील
Shivsena UBT MPs: उद्धवसेना पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर
उद्धवसेना पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर पोहचल्याची चर्चा राजधानीत रंगली असून, उद्धवसेनेच्या खासदारांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेटीसाठी वेळ मागितली आहे. मात्र, बिर्ला यांनी अद्याप कुणालाही भेटीची वेळ दिली नसल्याची माहिती आहे. काही खासदार दिल्लीत पोहोचल्याने ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा आहे. उद्धवसेनेतील सहा खासदारांच्या बंडखोर गटाचे नेतृत्व हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर करीत असल्याची माध्यमांमध्ये चर्चा आहे. आष्टीकर यांनीच बिर्ला यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली असल्याचे समजते. दक्षिण मुंबईचे खासदार अनिल देसाई हेही सध्या दिल्लीत असून त्यांनीही बिर्ला यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली असल्याचे कळते.
राजकीय हालचालींना वेग आला असतानाच संजय राऊत यांनी एका एका खासदाराला १५ कोटी रुपये दिले जात असल्याची पोस्ट सोशल मीडियावर केली. यामुळे शिवसेना फुटीच्या चर्चेला बळ मिळाले आहे. विशेष म्हणजे, अलीकडेच खासदार संजय देशमुख यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतली होती.
Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट
Comments are closed.