PM Kisan Yojana : 20 जूनला शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 जमा होणार, ‘ही’ गोष्ट पूर्ण करा अन्यथा…

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) प्रत्येक चार महिन्याला शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळतात. आत्तापर्यंत या योजनेचे 22 हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. 23 वा हप्ता कधी येणार याची चर्चा सुरु आहे. तर येत्या 20 जूनला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 23 वा हप्ता मिळणार आहे. दरम्यान, जर अद्यापही काही शेतकऱ्यांची ईकेवायसी अपूर्ण असेल तर ती करणे अनिवार्य आहे.

ही योजना अशा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे, ज्यांच्या जमिनीचा तपशील पीएम किसान पोर्टलवर नोंदणीकृत आहे, ज्यांची बँक खाती त्यांच्या आधार (UID) कार्डशी जोडलेली आहेत आणि ज्यांनी त्यांची ई-केवायसी (ई-नो युवर कस्टमर) प्रक्रिया पूर्ण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 मार्च 2026 रोजी आसाममधील गुवाहाटी येथे एका कार्यक्रमात पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता जारी केला.

पीएम किसान योजनेचा नवीन हप्ता कधी मिळणार?

ही रक्कम 20 जून 2026 रोजी पीएम किसान लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे जमा केली जाईल. पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथून या निधीचे वितरण करतील.

ईकेवायसी अनिवार्य आहे का?

पीएम किसान पोर्टलनुसार, सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ईकेवायसी अनिवार्य आहे. ओटीपी-आधारित ईकेवायसी पीएम किसान वेबसाइटवरून ऑनलाइन पूर्ण करता येते, तर बायोमेट्रिक-आधारित ईकेवायसी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) येथे करता येते.

23 वा हप्ता कोणाला मिळणार नाही?

सरकारने काही संशयास्पद प्रकरणे ओळखली आहेत, ज्यांना पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळले जाऊ शकते. यामध्ये 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमिनीची मालकी मिळवलेल्या शेतकऱ्यांचा, तसेच एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत असलेल्या प्रकरणांचा समावेश आहे (उदा. पती-पत्नी दोघेही, एक प्रौढ सदस्य आणि एक अल्पवयीन सदस्य, इत्यादी). अशा प्रकरणांमध्ये, प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत लाभ रोखून ठेवण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांना 2000 रुपयांचे थेट हस्तांतरण (PM Kisan Samman Nidhi 23th Installment)

‘पीएम-किसान’ योजनेतील प्रत्येक हप्त्यामध्ये 2, 000 रुपयांचे थेट हस्तांतरण समाविष्ट असते. पारदर्शकता आणि वेळेवर लाभ मिळवून देण्यासाठी ही रक्कम कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट खात्यात जमा केली जाते.

शेतकरी या निधीचा वापर खालील गोष्टींसाठी करू शकतात:

बियाणे आणि खते खरेदी करणे

शेतीची अवजारे आणि इतर आवश्यक साधने

शेतीचा दैनंदिन खर्च

Comments are closed.