ओमराजे 3 तास विमानतळाबाहेर आलेच नाहीत, दिल्लीवरुन परतल्यानंतर पुणे विमानतळावर मोठा ड्रामा! नेमक
ऑपरेशन टायगर ओमराजे निंबाळकर न्यूज : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार फोडण्यासाठी सुरू असलेले ऑपरेशन टायगर अखेर यशस्वी झाले असून, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. या सर्व राजकीय भूकंपानंतर दिल्लीहून पुण्यात परतलेले खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत पुणे विमानतळावर तब्बल 3 तास प्रचंड नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या.
दिल्लीत ऑपरेशन टायगर फत्ते
गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे सुरू असलेल्या हालचालींना मंगळवारी (ता. 16) रात्री वेग आला. ठाकरे गटाचे फुटीर खासदार एक-एक करून दिल्लीत दाखल झाले, तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील रात्रीच दिल्लीत पोहोचले. या बंडखोर खासदारांना दिल्लीत अज्ञातस्थळी ठेवण्यात आले होते.
अखेर या 6 खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन आपण स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचे पत्र दिले. लोकसभा अध्यक्षांनी या स्वतंत्र गटाला मंजुरी दिली असून, हा गट लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे देखील रात्रीच पुण्यावरून खाजगी विमानाने दिल्लीला रवाना झाले होते आणि या बंडात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
पुणे विमानतळावर काय घडलं?
दिल्लीतून ओमराजे निंबाळकर विमानाने पुणे विमानतळावर उतरले. बंडाच्या या मोठ्या बातमीनंतर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि कॅमेरामन पुणे विमानतळाबाहेर त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी मोठ्या संख्येने दबा धरून बसले होते. मात्र, विमानतळावर उतरताच संभाव्य प्रश्नांचा भडिमार टाळण्यासाठी ओमराजे थेट बाहेर न येता विमानतळाच्या व्हीआयपी लाउंजमध्ये (VIP Lounge) जाऊन बसले. 3 तास उलटून गेले, तरीही ते लाउंजमधून बाहेर आले नाहीत. तब्बल 3 तासांच्या प्रतीक्षेनंतर ओमराजे बाहेर पडले. मुख्य प्रवेशद्वारावर माध्यमांची गर्दी पाहून त्यांनी थेट मुख्य गेटऐवजी विमानतळाच्या दुसऱ्या अंतर्गत मार्गाचा वापर केला.
धाराशिवमध्ये कार्यकर्त आक्रमक
धाराशिवमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांना भरभरून संधी दिली, एकदा आमदार आणि दोनदा खासदार केले, तरीही त्यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतल्यास, तो वेदनादायी ठरेल, असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख बंडू आदरकर आणि सुरेश गवळी यांनी इशारा देत, ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यास दिसतील तिथं तोंडाला शेण फासणार, असा इशारा दिला. धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून पक्षाशी गद्दारी कधीही सहन केली जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद
Comments are closed.