ना हिंदुत्व, ना विकास, ना विचारधारा, ओमराजेंसह 6 खासदारांनी ठाकरेंना सोडण्याचं हास्यास्पद कारण

Shivsena Opration Tiger मराठी-Uddhav Thackeray: ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज (18 जून) संसदीय दलाची बैठक बोलावण्यात आली होती. ठाकरेंच्या शिवसेनेकडून सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आला होता. या बैठकीकडे खासदारांच्या एकनिष्ठतेची लिटमस टेस्ट म्हणून बघितले जात होते. परंतु या बैठकीसाठी लोकसभेचे एकूण 9 पैकी 3 खासदार उपस्थित राहिले. ऑपरेशन टायगरमधील (Opration Tiger) चर्चेत असणारे 6 खासदार गैरहजर राहिल्याने एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून अनुपस्थित राहिलेल्या 6 खासदारांवर कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे.दरम्यान, बंडखोर खासदारांनी थेट शिवसेनेत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला, अशी संसदीय सूत्रांची एबीपी माझाला महत्वपूर्ण माहिती दिली आहे. बंडखोर खासदारांचे अध्यक्षांना शिवसेना प्रवेशाचेच पत्र देण्यात आले. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष बंडखोरांचा प्रस्ताव मान्य करणार का याची उत्कंठा लागली आहे. तसेच 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंनी साथ का सोडली, याचं हास्यास्पद कारणही समोर आलं आहे.

6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? (Why did 6 MPs part ways with Uddhav Thackeray Shivsena?)

पक्ष सोडण्यापूर्वी बंडखोर खासदारांनी मंजूर केलेल्या ठरावात, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे काँग्रेसमध्ये संभाव्य विलीनीकरण होण्याबाबतच्या भीतीचा उल्लेख करण्यात आला आहे. या ठरावात म्हटले आहे की, पक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीपासून भरकटला आहे आणि काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या उद्देशाने शिवसेनेची स्थापना करण्यात आली नव्हती. तसेच, तृणमूल काँग्रेसने काँग्रेसमध्ये विलीन व्हावे, असा सल्ला संजय राऊत यांनी दिल्याचा संदर्भ देत, भविष्यात ‘शिवसेना ठाकरे गट देखील काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकते, अशी भीती या ठरावात व्यक्त करण्यात आली होती. परिणामी, पक्ष नेतृत्वावरील अविश्वासामुळे बंडखोर खासदारांनी वेगळी वाट धरण्याचा निर्णय जाहीर केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, बंडखोर खासदारांनी स्वतःला स्वतंत्र गट म्हणून घोषित केलेले नाही; त्यांनी मंजूर केलेल्या ठरावानुसार, त्यांनी थेट शिवसेनेत विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, प्रसारमाध्यमांच्या वृत्तांमध्ये त्यांना ‘स्वतंत्र गट’ असे संबोधले जात असले तरी, फुटलेल्या खासदारांनी त्यांच्या ठरावात असा दावा करण्यात आला आहे की, ते शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन झाले आहेत.

बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या खासदारांना आजच नोटीस पाठवली जाणार- (Shivsena Opration Tiger)

बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या खासदारांना आजच नोटीस पाठवली जाणार आहे. ठाकरे गटाकडून तातडीने नोटीस पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नोटीसवर प्रत्येक खासदारांकडून उत्तर मागितलं जाणार आहे. नोटीसला उत्तर देण्यासाठी केवळ काही तासांचाच वेळ दिला जाईल. दिलेल्या वेळेत उत्तर आलं नाही, तर मग पुढे कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. कारवाई करण्याचे अधिकार लोकसभा अध्यक्ष यांच्याकडे असणार आहेत. सोबतच नव्या गटाला मान्यता देण्याचे अधिकार देखील लोकसभा अध्यक्ष यांच्याकडेच राहतील. शिवसेना दोन्ही गटांची पुढची लढाई आता लोकसभा अध्यक्षांच्या दारात जाईल. लोकसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार, याकडे आता पुढचं लक्ष असेल.

ठाकरेंची साथ सोडण्याच्या तयारीत असलेल्या खासदारांच्या घराबाहेर मोठी सुरक्षा वाढवली- (Shivsena Opration Tiger)

ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंची साथ सोडण्याच्या तयारीत असलेल्या खासदारांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. या घटनेचे पडसाद राज्यात उमटू शकतात, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता कुठलाही अनिश्चित प्रकार घडू नये या अनुषंगाने स्थानिक पोलिसांकडून खासदारांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनीही काल झालेल्या पत्रकार परिषदेत अनुपस्थित खासदारांना इशारा दिला होता. त्यानूसार खबरदारी म्हणून पोलिसांकडून संबंधित खासदार यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवल्याचे कळते. मुंबईतील खासदार संजय दिना पाटील यांच्या घराबाहेरही मोठा पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे दरम्यान नाॅटरिचेबल असलेल्या खासदारांचा वेगळा गट होत असताना. या गटाचं नेतृत्व संजय जाधव यांच्याकडे दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

उद्धव ठाकरेंची साथ सोडणाऱ्या खासदारांची नावं- (Shivsena Opration Tiger MP List)

1. संजय जाधव

2. संजय देशमुख

3. नागेश पाटील आष्टीकर

4. ओमराजे निंबाळकर

5. भाऊसाहेब वाकचौरे

6. संजय दिना पाटील

ठाकरेंच्या नऊ खासदारांची नावे- (Shivsena MP List)

1. अनिल देसाई

2. अरविंद सावंत

3. संजय दिना पाटील

4. राजाभाऊ वाजे

5. संजय जाधव

6. संजय देशमुख

7. नागेश पाटील आष्टीकर

8. ओमराजे निंबाळकर

9. भाऊसाहेब वाकचौरे

ऑपरेशन टायगरबाबत सगळे अपडेट्स, VIDEO:

संबंधित बातमी:

Shivsena Opration Tiger मराठी-Uddhav Thackeray मोठी बातमी: अखेर ओमराजेंसह 6 खासदार फुटले, ऑपरेशन टायगर यशस्वी, ठाकरेंचा व्हिप डावलला, 3 खासदारच उपस्थित!

Shivsena Opration Tiger मराठी Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेंनी ओमराजे निंबाळकर, संजय दीना पाटीलसह 6 खासदारांना एकत्र कॉलवर घेतलं; ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं सांगत म्हणाले…

Comments are closed.