संजय दिना पाटील यांचा शेवटपर्यंत खोटारडेपणा, विमान पकडून लगेच बैठकीला येतो म्हणाले अन् गायब
मुंबई : ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असलेल्या सहा खासदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. पक्षाने व्हिप बजावूनही ते दिल्लीतील बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. अशातच या बैठकीतील एक मोठी माहिती समोर आली आहे. या बैठकीसाठी लगेच पोहोचतो असं सांगूनही संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) हे आले नाहीत. त्यामुळे शेवटपर्यंत ते खोटं बोलत असल्याचं उघडकीस आलं.
शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर (Operation Tiger) हे यशस्वी झालं असून ठाकरेंच्या पक्षात असलेल्या सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे. त्यामध्ये संजय जाधव, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील आणि नागेश पाटील आष्टीकर यांचा समावेश आहे. हे खासदार शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार असून शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी त्याची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
Uddhav Thackeray MP Meeting : ठाकरेंच्या बैठकीत काय झालं?
ठाकरेंच्या पक्षाचे सहा खासदार फुटणार अशी चर्चा सुरू असतानाच गुरूवारी नवी दिल्लीत संसदीय पक्षाची एक बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला सर्व खासदारांनी उपस्थित राहावेत यासाठी व्हिप बजावण्यात आला होता. परंतु जे सहा खासदार फुटणार अशी चर्चा होती, त्यापैकी कुणीही या बैठकीला उपस्थित राहिलं नाही. या बैठकीला खासदार संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते.
Sanjay Dina Patil Rebel : संजय दिना पाटलांचा खोटारडेपणा
शुक्रवारच्या बैठकीला आपण उपस्थित राहणार असल्याचं ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. मात्र ते बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे बैठकीच्या ठिकाणाहूनच त्यांना फोन लावण्यात आला. त्यावर आपण विमान पकडून लगेच बैठकीला येत असल्याचं संजय दिना पाटील यांनी सांगितलं.
बैठकीला येणार असं शेवटपर्यंत म्हणणारे संजय दिना पाटील हे काही उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून त्यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे.
Operation Tiger MP List : कोणते खासदार फुटल्याचा दावा?
1. संजय जाधव (परभणी)
2. संजय देशमुख (यवतमाळ– वाशिम)
3. नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली)
4. ओमराजे निंबाळकर (धाराशिव)
5. भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी)
6. संजय दीना पाटील (ईशान्य मुंबई)
उद्धव ठाकरे शिवसेनेच्या खासदारांची यादी : उद्धव ठाकरे कोणते खासदार?
1. अरविंद सावंत (दक्षिण मुंबई)
2. अनिल देसाई (दक्षिण मध्य)
3. राजाभाऊ वाजे (नाशिक)
ही बातमी वाचा:
Sanjay Raut Arvind Sawant : फुटणाऱ्या आमदार-खासदारांना रस्त्यात तुडवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा ॲक्शन प्लॅन ठरला
Comments are closed.