ऑपरेशन करायला वाघाचं काळीज लागतं लांडग्याचं नाही, डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करतो : एकनाथ शिंदे

मराठी : डॉक्टर नसलो तरी मी ऑपरेशन करतो. ऑपरेशन करायला वाघाचं काळीज लागतं लांडगग्याचं नाही. वाघाचं कातडी पांघरुन वाघ होता येत नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार टीका केली. त्यांच्याकडे काटे आणि चमचे आहेत. कसा वाढणार पक्ष. त्यांना आठवण करुन द्या की आता परिस्थिती बदलली आहे, त्यानुसार चालायचं असतं. मी कोण आहे. मी मी मी नाही आम्ही म्हणा. मी मी म्हणणाऱ्या रावणाची लंका जळून खाक झाली. जनता जनादर्न सगळी आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले.

हिंमत असेल तर समोर या, शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवतील का?

चार वर्षापूर्वी याच लांडग्यांनी मला धमक्या दिल्या होत्या. मुंबईत तर यावचं लागेल. वरळीतून जावचं लागेल. अरे कुणाची काय जहागिरी आहे का मुंबई. एकनाथ शिंदे एकटा आला. हेलिकॉप्टरने नाही तर गाडीतून आलो. बाय रोड गेलो. वरळीतून गेलो, तिथे थांबलो. तेव्हा मक्या देणारे ऑनलाईन बघत होते. हे काय मला चॅलेंज देणार. आता म्हणतात तुडवा, हिंमत असेल तर समोर या म्हणावं. रामदास भाई म्हणाले की, शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवतील का? असे शिंदे म्हणाले. सकाळी खासदारांना शिव्या द्यायच्या आणि संध्याकाळी त्यांना चांगल म्हणायचं हे काय चाललयं असे एकनाथ शिंदे म्हणाले.

जो भगव्याला विसरला तो राजकारणातून संपला

शिवसेना म्हणजे भगवं वादळ आहे. जो भगव्याला विसरला तो राजकारणातून संपल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. बाळासाहेंबाना ज्यांचा तिसरस्कार होता त्यांचा तुम्ही जयजयकार करता अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली. आम्ही शिवसेना पुढे नेण्याचं काम केलं त्यांना तुम्ही शिव्या देताय. आपला उठाव सुपरहीट झाला. जनतेनी स्वीकारल्याचे शिंदे म्हणाले. आम्ही जनतेच्या न्यायालयात जिंकलो असे शिंदे म्हणाले. उठाव केला तेव्हा म्हणाले कोणीही निवडून येणार नाही सोबत राहणार नाही. पण मी म्हणालो होत एकही निवडून नाही आलो तर राजकारण सोडून देईन आणी गावाकडे शेती करायला जाईन. पण आपण 60 आमदार निवडून आणल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

Comments are closed.