देशाला आणि आपल्याला ऑपरेशन कमळ राबवावं लागेल, उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिन सोहळ्यात भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. याशिवाय पक्ष सोडणाऱ्या खासदारांना देखील ठाकरे यांनी लक्ष्य केलं. ठाकरे कुटुंबावर आरोप करणाऱ्यांना देखील प्रत्युत्तर दिलं. देशाला आणि आपल्या सगळ्याला मिळून ऑपरेशन कमळ करावं लागेल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
मातोश्रीवर शिंतोडे उडवतंय ही औलाद कोणाची आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. शिवसेना स्थापनेचा नारळ माझ्यासमोर फुटलेला आहे, ते तुषार माझ्या माझ्या अंगावर उडाले आणि भिजवून टाकलं होतं, सर्वात ज्येष्ठ शिवसैनिक असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
मातोश्रीवर जळताय,ठाकरेंवर जळताय मात्र ठाकरेंनी काय सोसले काय भोगले हे माहिती आहे का? ब्राम्हणी वृत्ती जुन्या रूढी मोडून काढल्या पाहिजे यासाठी प्रबोधनकार ठाकरे उभे राहिले. माझ्यावरती माझ्या पत्नीवरती आदित्य वर तेजस वर आरोप केले जाताय बदनामी केली जातीये..सोसावे किती? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
आज गद्दारी झाली त्यावर मी मतदारांची माफी मागतो, मोदी लाट असताना तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला होता. 9 खासदार डोलाने निवडून आले, का फोडताय?काय मिळणार फोडून… इतके सत्ता पिपासू झालात असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
देशाच्या हिताचे निर्णय घ्या, आम्ही पाकिस्तानातून आलेलो नाही आम्ही देशप्रेमी आहोत. माझ्या आजोबाला विरोध करणारे गोमूत्र धारी होते. आमचा हिंदुत्व शेंडी जाणव्याचा नाही. राष्ट्रीयत्व हे आमचं हिंदुत्व आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
भेसळ युक्त रक्त भगवा हातात घेऊ शकत नाही. लोकशाही वरचा विश्वास उडून चालला आहे. आपण म्हणतो मशाल समोर बटन दाबा, मतं आम्हाला मिळेल. पवारसाहेब म्हणतात तुतारीचं बटणं दाबा, मतं आम्हाला मिळतील. पण भाजपवाले म्हणतात कोणाचंही बटणं दाबा माणूस आमच्याकडे येणार, असा टोला उद्धव ठाकरेंनी मारला.
आता देशाला आणि आपल्या सगळ्यांना मिळून ऑपरेशन कमळ करावं लागेल. तरुणांना झुरळ म्हणतात या देशाचा भवितव्य काय? सध्या लोकशाहीला धोका निर्माण झालेला आहे. जे.पी. नड्डा बोलले होते, वन नेशन इलेक्शन आता यांची वाटचाल वन नेशन नो इलेक्शनच्या दिशेनं सुरु आहे. तुम्ही या वाटेनें जातं असाल तर दीर्घाकाळ सत्ता मिळणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
याच्यापुढे शिवसेना निवडणूक लढवणार नाही माझ्यासोबत किती जण राहतील? मर मर आपण करायची माणसं निवडून आपण आणायची नंतर खोके देऊन घेऊन हे जाणार, निवडणुकी आधी लाडकी बहीण योजना आणली नंतर 80 लाख बहिणींना बाहेर केलं आहे.
मेहनत तुम्ही केली या खासदारांना तुम्ही निवडून आणलं, आता जाब विचारायचा अधिकार सुद्धा तुमचा आहे… मी आदेश काय देऊ, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
Omraje Nimbalkar : होय, भावनिकदृष्ट्या मी चुकलोय, पण राजकीयदृष्ट्या माझा निर्णय योग्यच; ओमराजे निंबाळकरांनी मौन सोडलं
Comments are closed.