IND vs AFG ODI – हिंदुस्थानचे निर्विवाद वर्चस्व! अफगाणविरुद्धची वनडे मालिका 3-0 ने जिंकली
हिंदुस्थानने वनडे क्रिकेट मालिकेत निर्विवाद वर्चस्व राखत अफगाणिस्तानवर ३-० असे निर्भेळ अखेरच्या वनडे सामन्यात, तर यश संपादन केले. तिसऱ्या आणि हिंदुस्थानने अफगाणिस्तानचा धुव्वा उडविला. प्रसिध कृष्णाच्या पाच विकेच्या जोरावर अफगाणिस्तानला २१८ धावांत रोखले गेले. त्यानंतर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांच्या शतकी सलामीमुळे हिंदुस्थानने सहजपणे ९ विकेट्स राखत व १२८ चेंडू राखत विजय साकारला.
प्रसिधच्या गोलंदाजीवर रोहितने सलग तीन झेल पकडत पाहुण्यांना जोरदार धक्के दिले; पण त्यांचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी अखेरपर्यंत मैदानात उभा राहीला आणि त्यामुळेच त्यांना २०० धावांचा पल्ला ओलांडता आला. शाहिदीला अझमतुल्लाह ओमरझाईची ५० धावांची चांगली साथ मिळाली; पण ओमरझाई बाद झाल्यावर शाहिदीने शतक झळकावत संघाला सावरले. शाहिदीने १३ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर १०२ धावा केल्या.
२१९ धावांचा पाठलाग करताना रोहित आणि यशस्वी यांनी दिली. दोघांनाही यावेळी शतक १७० धावांची दणदणीत सलामी झळकावण्याची संधी होती; पण रोहित त्यामध्ये अपयशी ठरला. रोहितने यावेळी ९ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ७९ धावांची नेत्रदीपक खेळी साकारली. रोहित अपयशी ठरला; पण यशस्वीने शतकाचे स्वप्न साकारले. यशस्वीने १४ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ११० धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक
अफगाणिस्तान: ४४.२ षटकांत सर्व बाद २१८ (हशमतुल्लाह शाहिदी १०२, अझमतुल्लाह ओमरझाई ५०; प्रसिध कृष्णा ५/२३). पराभूत वि. हिंदुस्थान : २८.४ षटकांत १ बाद २२४ (यशस्वी जैस्वाल नाबाद ११०, रोहित शर्मा ७९; मोहम्मद नबी १/४७).
Comments are closed.