इकडे ओमराजेंनी सस्पेन्स तयार केला, तिकडे संजय दिना पाटलांची लेकही मातोश्रीवर पोहोचली, ‘ऑपरेशन ट
उद्धव ठाकरे आणि राजूल पाटील गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचा राजकीय अवकाश व्यापून टाकलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या यशस्वीतेबाबत शंका उपस्थित करणाऱ्या काही घडामोडी रविवारी घडल्या. ठाकरे गटाचे संभाव्य फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर हे रविवारी दुपारी धाराशिवमध्ये जाऊन आपल्या समर्थकांशी संवाद साधणार आहेत. कालच पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणात कोर्टाने विरोधात निकाल दिल्यामुळे ओमराजे यांना जबर धक्का बसला होता. त्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी आपण अजून शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही, असे वक्तव्य केले होते. यानंतर शनिवारी मध्यरात्री ठाकरे गटाच्या दोन आमदारांनी पुण्यात ओमराजे निंबाळकर यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी ओमराजे निंबाळकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरुन बोलणे झाल्याचीही माहिती आहे. यानंतर सध्या ओमराजे निंबाळकर यांना आपल्याच गटात ठेवण्यासाठी ठाकरे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. हे सर्व प्रयत्न सुरु असताना रविवारी सकाळी आणखी एक महत्त्वाची घडामोड घडली. (Maharashtra Politics news)
ईशान्य मुंबईचे ठाकरे गटाचे फुटीर खासदार संजय दिना पाटील यांची मुलगी आणि नगरसेविका राजुल पाटील काहीवेळापूर्वीच मातोश्रीवर पोहोचल्या आहेत. त्या उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. राजुल पाटील यांचे वडील शिंदे गटासोबत जाणार असले तरी राजुल यांनी आपण ठाकरे गटात असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता राजुल पाटील उद्धव ठाकरे यांच्यासमोर काय बाजू मांडणार, हे बघावे लागेल. राजुल पाटील यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि संजय दिना पाटील यांचाही संपर्क होणार का, हे बघावे लागेल. संजय दिना पाटील यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी ईशान्य मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मातोश्रीवर बोलावून घेतले होते. लवकरच उद्धव ठाकरे सहा फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजुल पाटील यांची मातोश्रीवारी महत्त्वाची मानली जात आहे. तत्पूर्वी संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानीही जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, ओमराजे निंबाळकर हे सोमवारी मातोश्रीवर जाण्याची शक्यता आहे. यावेळी ते उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपली वैयक्तिक भूमिका मांडली, असे सांगितले जात आहे.
Rajool Patil: उद्धव ठाकरेंना भेटल्यानंतर राजुल पाटील काय म्हणाल्या?
मी उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांना भेटायला आले होते. मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. मी पक्षातच आहे, त्यांच्यासोबत आहे. मी माझे कार्य निष्ठेने करेन. आज मी मतदारसंघात त्यांचे स्वागत करणार आहे. मी माझे म्हणणे मांडले, उद्धव ठाकरे हॅपी आहेत. आमच्या घरात वैयक्तिक निर्णय घेण्याची पद्धत आहे. माझे वडील त्यांचा निर्णय घेतील, मी माझा निर्णय तुम्हाला कळवत आहे, असे राजुल पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
आणखी वाचा
उद्धव ठाकरेंचा फोन, ओमराजे म्हणाले, ‘तुम्हीच मला मोठं केलंय, मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही’
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे
Comments are closed.