ओमराजेंना परत आणण्यासाठी ठाकरे गटाचे युद्धपातळीवर प्रयत्न, संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या घरी प

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे अचानक मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांत राज्यात घडलेल्या प्रचंड मोठ्या राजकीय घडामोडी आणि ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांच्या अनपेक्षित भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे.(Raj Thackeray and Sanjay Raut)

Raj Thackeray and Sanjay Raut: भेटीमागचे काय आहे कारण?

अधिकृतपणे या भेटीचे कारण अद्याप अस्पष्ट असले, तरी गेल्या दोन-तीन दिवसांत ठाकरे गटाला लागलेले मोठे सुरुंग या भेटीमागे असण्याची दाट शक्यता आहे. ठाकरे गटाचे ६ खासदार फुटल्याची आणि त्यांनी संसदेत नवा गट स्थापन केल्याची धक्कादायक घडामोड नुकतीच समोर आली आहे. या फुटीनंतर थेट संजय राऊत यांनी ‘शिवतीर्थ’ गाठल्याने या भेटीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

Raj Thackeray and Sanjay Raut:  ‘शिवतीर्था’वरील कोणत्या चर्चांची शक्यता

ठाकरे गटाचे जे ६ खासदार फुटले आहेत, त्यांच्यावर अपात्रतेची किंवा कोणती कायदेशीर कारवाई करता येऊ शकते का? तसेच राहिलेल्या लोकप्रतिनिधींची मनधरणी कशी करायची, यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. तर कालच मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी ‘ऑपरेशन टायगर’ आणि भाजपमधील अंतर्गत समीकरणांवर भाष्य केले होते. अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्या वाढत्या जवळीकीवर तसेच भाजपमधील असंतोषावर राज ठाकरेंनी बोट ठेवले होते. या मुद्द्यांवर संजय राऊत राज ठाकरेंसोबत सविस्तर संवाद साधू शकतात. मुंबई आणि इतर महानगरपालिकांच्या निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गट एकत्र लढले होते. मात्र, आता खासदार फुटल्यानंतर दोन्ही बाजूंचे नगरसेवकही फुटण्याच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे आपले उरलेले नगरसेवक पक्षात कसे टिकवून ठेवायचे आणि त्यांच्याशी कसा संपर्क ठेवायचा, याची रणनीती या बैठकीत ठरू शकते. ठाकरे गटावर ओढवलेल्या या मोठ्या राजकीय संकटामध्ये संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यात नेमकी काय गुप्त चर्चा होते, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.