ENGvsNZ: न्यूझीलंडच्या विजयाचा 'खरा नायक', 11 विकेट्स घेत इंग्लंडचा धुव्वा उडवला अन् शेन वॉर्नचा 21 वर्ष जुना रेकॉर्डही मोडला!
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात केनिंग्टन ओव्हल येथे दुसरा कसोटी सामना खेळला गेला. त्यामध्ये न्यूझीलंडने उल्लेखनीय कामगिरी केली. पहिली कसोटी गमावल्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या सामन्यात यजमानांना २५३ धावांनी पराभूत केले. ओव्हलमध्ये मिळवलेल्या या एकतर्फी विजयामुळे तीन सामन्यांची ही मालिका १-१ अशी बरोबरीत आली आहे.
न्यूझीलंडच्या या महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक विजयाचा नायक ठरला वेगवान गोलंदाज मॅट हेन्री. त्याने या सामन्यात ११ विकेट्स घेण्याची अप्रतिम कामगिरी केली. त्याने आपल्या स्विंग आणि सीम गोलंदाजीने इंग्लंडच्या फलंदाजांना हैरान केले. त्याने दोन्ही डावांत १०९ धावा देत ११ विकेट्स घेण्याचा इतिहास रचला.
ओव्हलवरील हेन्रीची ही कामगिरी अनेक वर्षे चाहत्यांचा लक्षात राहिला. त्याने पहिल्या डावात ५ आणि दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेत एक दुर्मिळ विक्रम केला. २००५ च्या ऍशेस मालिकेत शेन वॉर्ननंतर ओव्हलवर एकाच सामन्यात १० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स (टेन-विकेट्स हॉल) घेण्याची कामगिरी करणारा हेन्री पहिला गोलंदाज ठरला आहे. तसेच तो ओव्हलवर १० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स ३२ वर्षांत पहिलाच वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी अशी कामगिरी डेव्हन माल्कमने केली होती. विशेष म्हणजे हेन्रीचे हे कसोटी कारकिर्दीतील पहिलाच १० विकेट्स घेण्याची कामगिरी आहे. त्याने पहिल्या डावात ८० धावा देत ५ विकेट्स आणि दुसऱ्या डावात केवळ २९ धावा देत ६ विकेट्स घेतल्या.
हेन्रीची ही भन्नाट कामगिरी न्यूझीलंडच्या गोलंदाजाची इंग्लंडमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
इंग्लंडमध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजांची सर्वोत्कृष्ट कामगिरी
११/१०९ – मॅट हेन्री (द ओव्हल, २०२६) *
11/169 – डायोन नॅश (लॉर्ड्स, 1994)
10/108 – टिम साउथी (लॉर्ड्स, 2013)
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले होते. न्यूझीलंडने पहिल्या डावात ३९१ धावा केल्या, त्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने केवळ २९१ धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडकडे १०० धावांची आघाडी आली. त्यांनी दुसऱ्या डावात ३६१ धावा केल्याने इंग्लंडसमोर ४६३ धावसंख्येचे लक्ष उभे होते, मात्र संघ २०९ धावांतच गारद झाला.
Comments are closed.