ओमराजे इकडे एकनाथ शिंदेंच्या घरी; तिकडे धाराशिवमधील कार्यालयावरुन मशाल अन् ठाकरें नाव काढलं

धाराशिव : ठाकरेंच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या (मराठी) शिवसेनेत प्रवेश निश्चित केला आहे. तत्पूर्वी आज दिल्लीत मुंबईत आल्यानंतर या सर्वच खासदारांना मोठ्या पोलीस बंदोबस्तात एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील नंदनवन बंगल्यावर आणण्यात आले. येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सर्व फुटीर खासदारांची बैठक झाली. त्यामध्ये, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही समावेश आहे. एकीकडे ओमराजे निंबाळकर (Omraje nimbalkar) यांची एकनाथ शिंदेंसोबत बैठक सुरू होती, दुसरीकडे धाराशिवमध्ये ओमराजेंच्या कार्यालयातून ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल आणि नाव गायब झालं आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदार आज राजकीय अधिकृत भूमिका जाहीर करणार आहे. त्याआधी ठाकरेंचे फुटलेले 4 खासदार आज मुंबई विमानतळावर दाखल झाले. संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे आणि नागेश पाटील आष्टीकर आज दुपारी 1.30 वाजता विशेष विमानाने मुंबई विमानतळावर दाखल झाले. यानंतर आपल्या खाजगी वाहनाने ठाण्यातील एकनाथ शिंदे यांचा मुंबईतील निवासस्थान नंदनवनच्या दिशेने निघाले होते. इथेच सर्व खासदारांची बैठक झाली, त्यात ओमराजे निंबाळकर हेही होते. शिवसेना शिंदे गटातील पक्षप्रवेशापूर्वीच ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यालयावरील मशाल चिन्ह आणि उद्धव ठाकरे यांचे नाव हटवण्यात आलं आहे. ओमराजेंनी धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय जाहीर करताच त्यांच्या कार्यालातून मशाल चिन्हही गाय झालं आहे. धाराशिव शहरातील पवनराजे कॉम्प्लेक्स येथील शिवसेना कार्यालयावरील मशाल चिन्ह हटवण्यात आलं असून आता तिथे धनुष्यबाण लावण्यात येईल.

उद्धव ठाकरे यांची साथ सोडताच ओमराजे निंबाळकर यांना मशाल चिन्ह नकोसे झाल्याचं दिसून आलं. ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या पवनराजे कॉम्प्लेक्स येथील कार्यालयावर लावलेलं मशाल चिन्ह आणि उद्धव ठाकरे यांचं नाव रात्रीतूनच काढून टाकले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी काल रात्री शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांची घोषणा झाली पण प्रवेश अद्याप झालेला नव्हता. त्यापूर्वीच ओमराजे यांनी कार्यालयावरील मशाल चिन्ह हटवले आहे. दुसरीकडे ओमराजेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली असून काही वेळातच त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे.

मशाल चिन्हाचा दिला होता दाखला

दरम्यान, याच मशाल चिन्हावरून ठाकरेंच्या शिवसेनेला पाटील कुटुंबीयांनी टीका करत डिवचले असता. ओमराजे निंबाळकर यांनी मशालचे कौतुक करत साडेतीन लाखाच्या मताधिक्याने निवडून आल्याचा दाखला दिला होता. ज्या चिन्हावर लोकसभा निवडणूक जिंकली ते चिन्ह पक्षप्रवेशापूर्वीच एका रात्रीतून आता हटवले आहे.

हेही वाचा

ठाकरेंचे आमदार ओमराजेंच्या घरी पोहोचताच एकनाथ शिंदेंची गुप्तचर यंत्रणा अलर्ट, बिल्डिंगबाहेरुन लगेच नंदनवन बंगल्यावर फोन फिरवला, बाणेरमध्ये मध्यरात्री काय घडलंय?

Comments are closed.