हॉस्पिटलमधील कामे आटोपली, नंतर केबिनमध्ये गेले अन्…; नागपुरात मोठ्या रूग्णालयातील डॉक्टरचा सं
नागपूर : नागपूरच्या प्रसिद्ध न्यूरॉन रुग्णालयात डॉ. ईश्वरचंद्र चांदेवार यांचा त्यांच्या कक्षातच संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. मृत डॉक्टरच्या कक्षात काही इंजेक्शन आढळल्याने इंजेक्शनचा (Nagpur Doctor Death) ओव्हरडोज झाल्यामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. डॉ. चांदेकर आयुर्वेदिक डॉक्टर होते आणि ते न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. काल सकाळी त्यांनी रुग्णालयातील नियमित काम (Nagpur Doctor Death) आटोपली. त्यानंतर त्यांच्या कक्षात विश्रांतीसाठी गेले. बराच वेळ त्यांनी दार न उघडल्यामुळे सहकाऱ्यांनी पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी दार उघडल्यावर डॉ. चांदेवार बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांची तपासणी केल्यावर त्यांचे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. सध्या पोलिसांनी धंतोली पोलीस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू केले आहे.(Nagpur Doctor Death)
Nagpur Doctor Death: नियमित कामे आटोपली त्यानंतर ते त्यांच्या कक्षात गेले अन्….
न्यूरॉन हॉस्पिटलमधील एका डॉक्टरचा कक्षातच संशयास्पद आढळल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. संबंधित डॉक्टरच्या कक्षात संशयास्पद इंजेक्शन आढळले आहे व त्याचा ओव्हरडोज झाल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यांनी तणावातून आत्महत्येचे पाऊल उचलले का याचा तपास सुरू आहे. या प्रकारामुळे नागपुरात खळबळ उडाली आहे. धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ईश्वरचंद्र नरहरी चांदेवार (४२, शिवशक्तीनगर, मानेवाडा) असे मृताचे नाव आहे. ते धंतोलीतील न्यूरॉन रूग्णालयात कार्यरत होते. त्यांचे शिक्षण आयुर्वेद वैद्यकीय शाखेत झाले होते व ते न्यूरॉनमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करायचे. सोमवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास त्यांनी हॉस्पिटलमधील नियमित कामे आटोपली. त्यानंतर ते त्यांच्या कक्षात गेले. सुमारे दीड ते दोन तास ते त्यांच्या कक्षातून बाहेर न आल्याने सहकाऱ्यांनी त्यांना आवाज दिला. मात्र, दरवाजा आतून बंद होता व कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने अखेर धंतोली पोलिस ठाण्यात कळविण्यात आले. (Nagpur Doctor Death)
पोलिस आल्यानंतर कक्षाचा दरवाजा उघडण्यात आला, तेव्हा ते बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांची तपासणी केली असता ते मृत झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घटनास्थळी पोलिसांना कुठलीही सुसाइड नोट न सापडल्याने मृत्यूचे कारण काय, याचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून नातेवाइकांनादेखील विचारणा करण्यात आली. मात्र, याबाबत अद्याप ठोस माहिती हाती आलेली नाही, पोलिसांचा तपास सुरू आहे.
Nagpur Doctor Death: काही तासांपासून अस्वस्थ वाटत होते
एका मराठी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार दरम्यान, डॉ. चांदेवार हे रविवारी रात्री घरून रूग्णालयामध्ये आले होते. त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी तपासणी देखील करून घेतली होती. कक्षातच त्यांचा मृतदेह आढळल्याने विविध शक्यतांचा तपास सुरू आहे. त्यांनी तणावातून आत्महत्येचे पाऊल उचलले की त्यांना इंजेक्शनचा ओव्हरडोस झाला की झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला हे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होऊ शकणार आहे. मात्र, या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
Crime Patrol Style Theft Special Report : ‘क्राईम पेट्रोल’ पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Comments are closed.