दांडीबहाद्दर मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तंबी; सार्वजनिक वक्तव्यांवरून नाराजी,
मुंबई: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सदस्यांना अत्यंत कडक शब्दांत तंबी दिली आहे. “सभागृहातील कामकाजात सर्व मंत्र्यांनी सक्रिय सहभागी व्हावे. मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे जर सभागृहाचे कामकाज स्थगित झाले, तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही,” असा थेट आणि गर्भित इशारा मुख्यमंत्र्यांनी (Devendra fadnavis) आपल्या सहकाऱ्यांना दिला आहे.(Devendra fadnavis) मागील अधिवेशनादरम्यान अनेकदा मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे सभागृहाचे कामकाज थांबवावे लागले होते, ज्यामुळे सरकारची कोंडी झाली होती. हाच अनुभव लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी (Devendra fadnavis) यावेळी आधीच आक्रमक पाऊल उचलले आहे. यापुढे केवळ मंत्र्यांना जाब विचारला जाणार नाही, तर त्यांच्या गैरहजेरीचा संपूर्ण तपशीलच सभागृहात मांडला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी (Devendra fadnavis)सांगितले आहे.
Devendra fadnavis : सार्वजनिक वक्तव्यांवरून नाराजी आणि विरोधकांना रोखण्याचे निर्देश
गेल्या काही दिवसांत सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या विधानांमुळे राजकीय वातावरण तापले होते. या पार्श्वभूमीवर, “काही मंत्र्यांच्या सार्वजनिक वक्तव्यांमुळे सरकारची प्रतिमा मलीन होत आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. आगामी अधिवेशनात विरोधकांना सरकारवर टीका करण्याची कोणतीही संधी मिळणार नाही, याची काटेकोर खबरदारी घेण्याचे निर्देशही त्यांनी सर्व मंत्र्यांना दिले आहेत.(Devendra fadnavis)
Devendra fadnavis : मतभेद माध्यमांमध्ये नाही, तर सरकारच्या व्यासपीठावर सोडवा
मंत्रिमंडळातील अंतर्गत वादावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “मंत्र्यांनी आपापसातील हेवेदावे किंवा मतभेद माध्यमांसमोर नेऊन पक्षाची आणि सरकारची नाचक्की करू नये. जे काही प्रश्न असतील ते सरकारच्या अंतर्गत व्यासपीठावर आणून सामोपचाराने सोडवावेत.” मुख्यमंत्र्यांच्या या थेट आणि आक्रमक भूमिकेमुळे ‘दांडीबहाद्दर’ आणि बेजबाबदार वक्तव्ये करणाऱ्या मंत्र्यांचे धाबे दणाणले असून, या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी बाकांवर मंत्र्यांची उपस्थिती अनिवार्य असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
संबंधित बातमी:
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
Comments are closed.