ओमराजे निंबाळकरांनी शिवसेनेत प्रवेश करताच एकनाथ शिंदेंनी पहिला डाव टाकला, धाराशिवमधील सर्व संघट

Omraje Nimbalkar and मराठी: ठाकरे गटाचे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सोमवारी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला. यानंतर काही तासांमध्येच एकनाथ शिंदे यांनी धाराशिव जिल्ह्यातील राजकारणाच्यादृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्या शिवसेना प्रवेशानंतर धाराशिवमध्ये (Dharashiv news) हा पहिला मोठा संघटनात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व संघटनांच्या कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे (मराठी) यांच्या आदेशानुसार धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना आणि अंगीकृत संघटनांच्या विद्यमान कार्यकारिण्या बरखास्त करण्यात आल्याची माहितीपक्ष सचिव संजय मोरे यांची प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. (Maharashtra Politics news)

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर जिल्ह्यातील शिवसेनेवर ओमराजे निंबाळकर यांचा प्रभाव राहणार आहे. त्यादृष्टीने आता एकनाथ शिंदेंकडून ओमराजे निंबाळकर यांचा बळ दिले जाणार  आहे. त्यासाठी नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून प्रत्येक संघटनेची नव्याने बांधणी केली जाणार आहे. दरम्यान, या निर्णयामुळे जिल्ह्यातील शिवसेनेतील नेतृत्वाची सूत्रे कोणाकडे जाणार, विविध गटांना किती प्रतिनिधित्व मिळणार आणि ओमराजे निंबाळकर यांच्या आगमनानंतर पक्ष संघटनेत कोणते नवे बदल दिसणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

ओमराजे निंबाळकर यांच्यासह संजय देशमुख, संजय जाधव,संजय दिना पाटील, भाऊसाहेब वाकचौरे आणि नागेश आष्टीकर या सहा खासदारांनी सोमवारी मुंबईतील कार्यक्रमात शिवसेनेत प्रवेश केला होता. यावेळी एकनाथ शिंदे यांनी ओमराजे निंबाळकर यांना मानाचे स्थान देऊन आपल्या बाजूला बसवून घेतले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी ओमराजे निंबाळकर यांचे प्रचंड कौतुक केले होते. खासदार ओमराजे निंबाळकर हे आपल्या मनाचे राजे आहेत. काहींनी ओमराजेंना हिणवलं, त्यांना रीलस्टार म्हणाले. त्यांच्याकडे होते तोपर्यंत चांगले होते. ते खरंच रिअल स्टार आहेत. हा कार्यकर्त्यांचा नेता आहेत. ते स्वतःच्या स्वार्थासाठी आलेले नाहीत. मतदारसंघाला न्याय देण्यासाठी आले आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. ओमराजे यांच्या वडिलांची केस होती, त्या केसचा दुर्दैवी आणि अनपेक्षित निकाल लागला. निकाल लागल्यानंतर त्याचदिवशी मी त्यांना फोन केला आणि सांगितलं हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी कायम उभा आहे. शिवसेना खंबीरपणे तुमच्यासोबत आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते.

आणखी वाचा

मराठी : संजय दिना पाटील बेधडक, ओमराजे मनाचे राजे ते नागेश पाटील आष्टीकर ओपनिंग बॅटसमन, ठाकरेंच्या फुटलेल्या खासदारांना शिंदेंकडून खास विशेषणं

Comments are closed.