मध्य प्रदेशातून मागवायचा गावठी कट्टे अन्…; सोशल मिडीयावरून पिस्तुल विकणारा ‘बबलू’ अखेर गजाआड;

पुणे : सोशल मिडियावरून खरेदी विक्री करणारा पिस्तुल (Pune Crime News)डीलर “बबलू” अखेर सापडला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने लातूरमध्ये (Pune Crime News) कारवाई केली आहे. पिस्तूलचा भलताच “शौक” असलेल्या बबलूचे सोशल मीडियावर अनेक फोटो समोर आले आहेत. इंस्टाग्रामवर फोटो अपलोड करून पिस्तुलांची (Pune Crime News) खरेदी विक्री करत होता. अटक केलेल्या आरोपीकडून तब्बल ५ पिस्तुल आणि ७ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. पुण्यासह राज्यातील अनेक गुन्ह्यांत आरोपीचा सहभाग आहे.(Pune Crime News)

Pune Crime News: गोळीबाराच्या घटनांमध्ये वापरले गेलेले पिस्तूल हे बबलूने विक्री केलेले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील पर्वती पोलिस ठाणे, खडक पोलिस ठाणे आणि वाघोली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यात एक तरुण पोलिसांच्या रडार वर होता. संबंधित तरुण हा पिस्तूल विक्रेता असल्याची माहिती पोलिसांना होती. शेख अहमद उर्फ बबलु सुरज सय्यद असे या तरुणाचे नाव असून तो पुण्यातील बिबवेवाडी भागात राहणारा आहे. पुण्यातील अनेक गोळीबाराच्या घटनांमध्ये वापरले गेलेले पिस्तूल हे बबलूने विक्री केल्याचं याआधी सुद्धा तपासातून समोर आलं होतं. या अनुषंगाने पुणे पोलिस त्याचा शोध घेत होते. गुन्हे शाखेच्या पोलिसांना बबलू हा लातूर जिल्ह्यातील एका गावात लपल्याची माहिती मिळालं होती. यानुसार गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने लातूर मध्ये जात सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं आहे. (Pune Crime News)

Pune Crime News: पिस्तूल विक्रेते यांच्या संपर्कात स्वतः….

त्याच्याकडे अधिक तपास करता बबलू हा सोशल मिडीया वरुन गावठी पिस्टल सोबत (Pune Crime News) फोटो काढुन ते प्रसारीत करत होता व पिस्टल व काडतुसे यांची खरेदी विक्री बाबत इंस्टाग्राम वरुन संपर्क साधत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी ने मध्यप्रदेश येथील उमरठी गावातील पिस्तूल विक्रेते यांच्या संपर्कात स्वतः राहुन त्याच्याकडून आपल्या ओळखीचे लोकांना तिथे पाठवुन मध्यस्थी करुन गावठी पिस्टल खरेदी करत असल्याचं सुद्धा समोर आलं आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ५ पिस्तूल सह ७ जिवंत काडतुसे असा एकूण १ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, आरोपीकडे आणखी काही पिस्तुल आहेत का तसेच त्याने कोणाकोणाला पिस्तूल विकले होते याचा तपास सुरू आहे.(Pune Crime News)

हेदेखील वाचा

Comments are closed.