काळे धंदे लपवण्यासाठी बाळासाहेबांचा आधार घेऊ नका, पावसकरांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

किरण पावसकर उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’मध्ये गळाला लागलेल्या ठाकरे गटाच्या सहा फुटीर खासदारांनी सोमवारी मुंबईतील कार्यक्रमात शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे गटाचे नेते किरण पावसकर (Kiran Pawaskar) हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होते. यावेळी पावसकर हे ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेत (Shivsena) कसा फरक आहे, ही शिवसेना कशी सामान्य कार्यकर्त्यांना जपणारी आहे, हे सांगत होते. त्यावेळी पावसकर यांच्या तोंडातून बाहेर पडलेले एक वाक्य वादाचा विषय ठरत आहे. किरण पावसकर यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या, ‘उद्धव आणि आदित्यला सांभाळा’ या आवाहनाची खिल्ली उडवल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. यावर किरण पावसकर यांनी आज प्रतिक्रिया दिली. स्वतःची पाप झाकण्यासाठी बाळासाहेबांचा किती वापर करणार. बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान करण्याचं कोणी धाडस करणार नाही, केलं तर ते सहन करणार नाही असे पावसकर म्हणाले. तुमचे काळे धंदे लपवण्यासाठी बाळासाहेबांचा आधार घेऊ नका अशी टीका देखील त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

2010 साली विधानपरिषदेचा राजीनामा उद्धव ठाकरेंमुळं दिला

काल उबाठाचे सहा खासदारांनी ओरिजनल शिवसेनेत प्रवेश केला. आनंदच वातावरण काल होतं. दुसरीकडे दुःखाचं वातावरण होत असे पावसकर म्हणाले.  हिंदूहृदय सम्राट तुम्ही म्हणत नाही. वंदनीय म्हणतात. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसला. 19 तारखेच्या वर्धापन दिनी षण्मुखानंदमध्ये नेत्याने सांगितलं आतापर्यंत तुम्ही माझ्यावर प्रेम केलं आता माझ्या मुलावर प्रेम करा त्यावर मी बोललो. शिवसेना प्रमुखांनी आम्हाला सांगितलं होत उद्धवला सांभाळा, आम्ही सांभाळल्याचे पावसकर म्हणाले. मी बरंच काही भोगलं आहे असे ते म्हणाले. किरण पावसकरला 94 साली पदावर घेतलं त्यावेळी बाळासाहेबांनी सही केली होती पत्रावर. 2008 ला निवडून आलो. 2010 ला मी MLC चा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांच्यामुळे राजीनामा दिल्याचे पावसकर म्हणाले. अजित पवार यांचं अभिनंदन त्यांनी मला निवडून आणलं. तुमचे काळे धंदे लपविण्यासाठी बाळासाहेबांचा आधार घेऊ नका.

राहुल गांधीचे पाय धुणार का?

संजय राऊत यांचं नाव घेऊन विचारतोय. मला का राजीनामा द्यावा लागला याच उत्तर द्या. हिंमत असेल तर असे पावसकर म्हणाले. कोव्हिडमध्ये पैसे खाल्लेली बाई माझ्यावर बोलणार. गांधींवर विश्वास आहे म्हणून राहुल गांधीचे पाय धुणार का? असा सवाल पावसकरांनी केला. 40 आमदार निघाले आज 60 झाले. उबाठाच्या लोकांना तुम्ही काय शिकवलं पैसे खायचे. गेले की पैशांसाठी गेले असे म्हणत असल्याचे पावसकर म्हणाले.

Kiran Pawaskar: किरण पावसकर नेमकं काय म्हणाले?

एकीकडे सांगितलं जातं आजपर्यंत तुम्ही मला सांभाळलतं, आता दुसऱ्याला सांभाळा.  त्यांना सांभाळलं की, मुलाला सांभाळा.  अरे हे काय पाळणाघर आहे का? इकडे सांगितलं जातं की, शिंदे साहेबांनी सांगितलं होतं, जे जे लोकं माझ्यासोबत आलेत, डॉ. श्रीकांत शिंदे त्यांची जबाबदारी ही तुमची आहे, तुम्ही माझ्यासोबत त्यांना सांभाळायचं आहे. हा दोन्ही पक्षांमधला फरक आहे.

Comments are closed.