तामिळनाडूतील दीपम वाद आता सर्वोच्च न्यायालयात

►चेन्नई

मद्रास उच्च न्यायायलाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका तामिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. राज्यातील तिरुप्परनकुंद्रम पर्वतावरील दीप प्रज्ज्वलित करण्याची अनुमती देणाऱ्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला राज्य सरकारने आव्हान दिले आहे. हा पूर्ण वाद पर्वतावरील एका जुन्या दगडी स्तंभावर दीपप्रज्ज्वलन करण्यावरून आहे. संबंधित ठिकाण श्री सुब्रमण्यम स्वामी मंदिर असल्याचे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने याप्रकरणात वक्फ बोर्डाला कुठलाच कायदेशीर अधिकार नसल्याचे म्हटले होते.

Comments are closed.