गिलचा ‘कॅप्टन इम्पॅक्ट’ दिसू लागला; आयसीसी क्रमवारीत थेट टॉप-2 मध्ये एन्ट्री, रोहित-विराट….
आयसीसीच्या फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत महत्त्वपूर्ण बदल दिसून आले आहेत. गेल्या आठवड्यात खेळल्या गेलेल्या रोमांचक कसोटी आणि एकदिवसीय (ODI) सामन्यांचा प्रभाव या क्रमवारीवर स्पष्टपणे दिसून आला आहे. इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने कसोटी क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे, तर भारताच्या शुबमन गिलने एकदिवसीय क्रमवारीत मोठी झेप घेत दुसरे स्थान मिळवले आहे.
जो रूटने दोन स्थानांची सुधारणा करत ८७१ रेटिंगसह आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले आहे. गेल्या आठवड्यात अव्वल स्थानी असलेला इंग्लंडचा हॅरी ब्रुक ८६६ रेटिंगसह एका स्थानाच्या घसरणीसह दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड देखील एका स्थानाच्या घसरणीसह ८५३ रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. दरम्यान, न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रने दोन स्थानांची प्रगती करत ७१५ रेटिंगसह दहावे स्थान गाठले आहे.
न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल ८१५ रेटिंगसह एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान टिकवून आहे. मात्र, भारताच्या शुभमन गिलने तीन स्थानांची मोठी झेप घेत दुसरे स्थान मिळवले आहे; त्याचे रेटिंग आता ७९१ झाले आहे.
भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली एका स्थान घसरुन तिसऱ्या क्रमांकावर आला आहे; एकदिवसीय मालिकेत न खेळल्याचा परिणाम त्याच्या क्रमवारीवर झाला आहे. रोहित शर्मा ७५४ रेटिंगसह चौथ्या स्थानावर कायम आहे.
अफगाणिस्तानचा इब्राहिम झद्रान दोन स्थानांच्या घसरणीसह पाचव्या क्रमांकावर आला आहे. श्रीलंकेचा चरित असलंका एका स्थानाच्या सुधारणेसह नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर इंग्लंडचा हॅरी ब्रुक दहाव्या क्रमांकासह पहिल्या दहा फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे.
येत्या काही दिवसांत अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने होणार असल्याने, आयसीसी क्रमवारीत आणखी महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळू शकतात. विशेषतः टी-२० क्रमवारीत मोठे चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
Comments are closed.