फर्स्ट क्लासच्या डब्यात दरवाजा बंद करण्यावरुन वाद, विरारच्या मयांकचा जीव गेला, कंबरेत अन् छातीत

मुंबई लोकल ट्रेन क्राईम न्यूज: मुंबई लोकल ट्रेनमध्ये (Mumbai Local Train) एका व्यक्तीची चाकू भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काल (23 जून) रात्री 10 च्या सुमारास सदर घटना घडली. मृत मयांक लोहार या अवघ्या 22 वर्षांचा होता. तो विरारचा राहणार होता. विरार – लोकल ट्रेनचा (Local Train) दरवाजा बंद करण्यावरुन झालेल्या वादातून मयांक लोहार (Mayank Lohar) याची एका माथेफिरुने चाकू भोसकून हत्या केली.  मयांक हा विरारच्या अमरनाथ बिल्डिंगमध्ये तीन भाऊ आणि एका बहिणीसह रहातो. सध्या मयांकच्या घरात शोकाकुल वातावरण आहे. त्याच्या मित्रांनी ही मयांक हा शांत आणि संयमी स्वभावाचा असल्याचं म्हटले आहे. (Mumbai Crime news)

मयांक लोहार याने  फायनान्स मार्केटिंग शाखेचे शिक्षण घेतले होते. गेल्या नऊ महिन्यांपासून तो अंधेरीच्या चकाला परिसरातील वेस्टसाइड येथे नोकरी करत होता.  तो दररोज विरार ते अंधेरी असा प्रवास करायचा. लोहार कुटुंबीय मूळचे नेपाळचे असले तरी ही मुंबईतील त्यांची सहावी पिढी आहे. सुरुवातीला मयांक लोहार अंधेरीत वास्तव्याला होता. मात्र, घर पुनर्विकासासाठी गेल्याने गेल्या पाच वर्षांपासून त्याचे कुटुंब विरार पूर्वेकडील भोईरपाडा येथे वास्तव्याला होते.  मयांकला एक बहीण आणि दोन भाऊ आहेत. काल रात्री ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी मयांकच्या कुटुंबीयांना फोन करुन त्याचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. (Mumbai News)

मुंबई न्यूज : माया लोहारचं नेमकं काय झालं?

काल रात्री 10 वाजता बोरिवली ते अंधेरी स्थानकादरम्यान ही घटना घडली. मुसळधार पावसात ट्रेनचा दरवाजा बंद करण्यावरून हा वाद झाला होता.  रेल्वे पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवाजा बंद करण्यावरुन वाद झाल्यानंतर इतरांनी आरोपीला मारहाण केली. त्यावेळी संतापलेल्या आरोपीने आपल्या बॅगेतून चाकू काढून मयांकवर हल्ला केला, ज्यात मयंकचा मृत्यू झाला. हल्लेखोर बोरिवली स्टेशनवर ट्रेन थांबण्यापूर्वीच उतरुन पसार झाला. सदर घटनेनंतर आरोपीला पकडण्यासाठी रेल्वे पोलिसांनी सहा पथके तैनात केली आहेत.

आणखी वाचा

Mumbai Local Train Crime News: दरवाजा बंद करण्यावरुन वाद; धावत्या लोकल ट्रेनमध्ये मयांक लोहारला संपवलं, अंधेरी-बोरीवलीदरम्यान काय घडलं?

Comments are closed.