संजय दिना पाटलांची मग्रुरी, एकनाथ शिंदे 5 मिनिटांच्या प्रतिक्रियेत 4 मिनिटे राऊतांवरच बोलले!
मराठी on Sanjay Patil मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या सहा खासदारांपैकी ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील वादात अडकले आहेत. त्यांच्याकडून वारंवार वादग्रस्त वक्तव्य केली जात असल्याचं समोर आलं आहे. शिवसैनिकांनी अंगावर यायचा प्रयत्न केल्यास ते रुग्णालयात किंवा स्मशानात पोहोचतील, अशी धमकी संजय दिना पाटील यांनी दिली होती. तर, आज पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ केली. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सारवासारव करताना अधिक वेळ खासदार संजय राऊत यांचं नाव न घेता त्यांच्याबाबत बोलण्यावर घालवला.
संजय पाटील यांच्यावर एकनाथ शिंदे : एकनाथ शिंदे कोण आहेत?
एकनाथ शिंदे माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, मी या सगळ्या प्रकाराची सविस्तर माहिती घेतो आणि तुमच्याशी सविस्तर बोलेन. परंतु, माझी संजय दिना पाटील यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी माझ्याकडे भावना केली की, पत्रकारांबद्दल चुकीचं वक्तव्य करण्याची माझी बिलकुल इच्छा नव्हती. माझे आणि पत्रकारांचे संबंध चांगले राहिले आहेत. पत्रकारांच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता.
एकनाथ शिंदे यासंदर्भात आणखी बोलताना म्हणाले की, जे रोज त्यांच्याविरोधात बोलतात, रोज अपशब्द काढतात,तोडून टाका, मारुन टाका, घरात घुसा आणि अत्यंत खालच्या आणि नीच दर्जाचे शब्द वापरतात. हा मीडियाचाही अपमान आहे. किती वेळापासून काय-काय बोलतात, ते आपण पाहिलं आहे. याचा राग संजय पाटील यांच्या मनात आहे. त्या पत्रकारांबाबत संजय दिना पाटलांच्या कोणताही राग नाही, असं एकनाथ शिंदे यांनी म्हणत संजय दिना पाटील यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. पत्रकारांबाबत असं वक्तव्य कोणी लोकप्रतिनिधींनी करु नये. मी त्यांना सांगितलं आहे की, आपल्याकडून पत्रकारांबाबत अपमानजक काही शब्द गेले असतील तर बोलून दिलगिरी व्यक्त करावी,असंही शिंदे यांनी म्हटलं.
2022 पासून काय भाषा वापरली जाते?
मी एवढंच सांगतो, संजय दिना पाटील यांनी माझ्याकडे भावना व्यक्त केल्या. परंतु, जे दररोज त्यांच्याविरोधात जे वक्तव्य करत आहे, परिवाराविरोधात वक्तव्य करत आहेत, हे अतिशय निंदनीय आहे. किती दिवस तुम्ही हे बघत आहेत, 2022 पासून काय भाषा वापरली जात आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का, अशा पद्धतीने आई-बहिणींचा उद्धार करणं, डोंट कट इट म्हणायचं. कुठल्या थराला जाऊन तुम्ही महाराष्ट्राची संस्कृती रसातळाला पोहोचवली आहे, याचा राग संजय पाटील यांच्या मनात आहे, असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले.
संजय दिना पाटील काय म्हणाले?
खासदार संजय दिना पाटील पत्रकारांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरताना म्हणाले की तुम्ही परत इकडे आलात तर मी तुम्हाला मारुन पाठवेन. हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा, तुम्ही उगाच माझ्या गां#% बोटं घालताय, परत आलात तर मारुन पाठवेन. हे मी तुम्हाला पोलिसांसमोर सांगतोय, तुम्हाला करायचंय ते करा, अशी भाषा संजय दिना पाटील यांनी वापरली.
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?
Comments are closed.