जिगरी मित्र दुसऱ्या पक्षात; शेवटच्या भेटीत काय बोलणं झालं? ओमराजेंविरुद्ध लढणार? शिंदेंकडून बोल

मुंबई : शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी सहा फुटीर खासदारांच्या विरोधामध्ये रणशिंग फुंकलं आहे. उद्यापासून ते पुढील तीन दिवस फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात ते दौरा करणार आहेत. उद्धव ठाकरे या सहाही खासदारांच्या मतदारसंघामध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधून ठिकठिकाणी मेळावे देखील घेणार आहेत. एकीकडे एकनाथ शिंदेनी ऑपरेशन टायगर तीनची तयारी केल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे  (uddhav thackeray) पक्ष संघटना मजबूत ठेवण्यासाठी दौरा करतात. आज ते नागपुरात पोहोचणार आहेत. त्यामुळे फुटलेल्या खासदारांवरती काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाच लक्ष लागलं आहे. तर खासदार ओमराज निंबाळकर फुटीनंतर उद्धव ठाकरेंचा 28 जूनला धाराशिव दौरा होणार आहे, ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून या दौऱ्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. धाराशिवमध्ये(Dharashiv) एकनाथ शिंदे (मराठी) यांची शेवटची सभा पार पडली, तिथेच उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि ओमराजे निंबाळकरांचे जिवलग साथीदार म्हणून ओळखले जाणारे कैलास पाटील (Kailas Patil) यांनी उद्धव ठाकरे यांचा दौरा, खासदार ओमराजे निंबाळकर आणि पक्षाची सध्याची राजकीय स्थिती याबाबत सखोल भाष्य केलं आहे.(Kailas Patil) एबीपी माझाला त्यांनी सखोल मुलाखत दिली, यामध्ये त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे.

Kailas Patil : पुढे काय वाढून ठेवले माहित नाही…

मन वळवण्यासाठीचा जो प्रयत्न अगदी शेवटपर्यंत ओमराजे निंबाळकरांचा तुम्ही करत होतात, वरुण सरदेसाई सुद्धा होते, तुमची मैत्री माध्यमांनी पण बघितली आहे आणि शिवसैनिकांना सुद्धा माहिती आहे, भलेही ते त्या शिवसेनेत गेले असतील, किती प्रयत्न केले आणि हा निर्णय झाल्यानंतर त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली त्यांनी त्यांना कारणं सांगितली आता पुढे काय? या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना कैलास पाटील म्हणाले, पुढे काय वाढून ठेवले माहित नाही, परंतु एक स्पष्ट भूमिका आहे की, हा निर्णय व्हायला नको होता आणि जेवढं प्रेम उद्धव साहेबांचं शिवसैनिकांच त्यांच्यावर होतं, तेवढं प्रेम त्यांना परत कधीच मिळणार नाही, असं मला वाटतं. बाकीचा निधी मिळेल. बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळतील का नाही माहित नाही, म्हणजे निधी बाकीचे विकास कामे या गोष्टी कदाचित मिळतील, पण जो विश्वास जे प्रेम होतं ते शिवसेनेकडेच होतं, शिवसैनिकांचे प्रेम होतं आणि उद्धव साहेबांचं विशेषत ठाकरे कुटुंबाचे प्रेम होतं त्यांच्यावर, ते तिकडं मिळणार नाही असंही ते म्हणालेत.

कैलास पाटील : दुर्दैवाने तो निर्णय झाला

कार्यकर्ते म्हणत होते, काही नेते म्हणत होते की, ओमराजे निंबाळकर आमच्या सोबत राहतील, तो विश्वास तुम्हाला पण शेवटपर्यंत होता होता? या प्रश्नावर कैलास पाटील म्हणाले, फक्त मला नाही, तर सगळ्यांनाच विश्वास होता. परंतु दुर्देवानं तो निर्णय झाला, पण तो निर्णय आता मान्य केला पाहिजे आणि पुढे चाललं गेलं पाहिजे.

Kailas Patil : मला माणूस म्हणून पाहिजे खासदार म्हणून मला नाही पाहिजे

उद्धव ठाकरेंशी काही बोलणं झालं होतं की, तुम्हाला काही उद्धव ठाकरे सांगत होते की, आपण हे केलं पाहिजे किंवा हा संदेश घेऊन तूम्ही जा? काय बोलणं झालं होतं? या प्रश्नावर बोलताना कैलास पाटील म्हणाले, त्यांनी मला बोलताना एवढंच सांगितलं की, ओमराजेंच्या विषयी खूप एक मुलासारखं त्यांचं नातं होतं. मुलाला जसं समजतात तशा पद्धतीने त्यांना त्यांच्या विषयी आत्मीयता होती, कारण त्यांना 2009 पासून त्यांनी प्रत्येक वेळेस त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे पक्ष उभा राहिला, स्वतः उद्धवजी ठाकरेसाहेब उभे राहिले, आणि त्यांचं म्हणणं होतं की, पुढच्याला खासदार पाहिजे, पण मला ओमराजे पाहिजेत, समोरच्यांना खासदार म्हणून ते विचारतायत पण मला ओमराजे हे माणूस म्हणून पाहिजे, माणूस चांगला आहे, मुलगा चांगला आहे आणि अशा माणसाचं पुढे करियर चांगलं आहे, तर तो मला माणूस म्हणून पाहिजे, खासदार म्हणून मला नाही पाहिजे,  हे उद्धव साहेबांचं वाक्य होतं, अशी माहिती पाटील यांनी दिली.

Kailas Patil :  मला वेळ द्या, मी माझा निर्णय ते सांगतो….

शेवटी काय बोलणं झालं? ओमराजे निंबाळकरांच उद्धव ठाकरेचं? उद्धव ठाकरेंनी काही कन्विन्स केलं? यावर प्रतिक्रिया देताना कैलास पाटील म्हणाले की, त्यांच्या दोघात बोलणं काय झालं हे मला माहित नाही. फक्त एवढंच मी आणि वरुण सरदेसाई आम्ही गेल्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं की, मी कार्यकर्त्याशी चर्चा करतो आणि एक दिवस मला द्या, मला वेळ द्या, मी माझा निर्णय सांगतो.

Kailas Patil :  थोडे दिवस गेल्यानंतर स्पष्टता येईल

सध्या स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये काय चर्चा आहे? कारण ज्या प्रतिक्रिया येतात, सोशल मीडियावर खास करून ओमराजेंबद्दल, हे सगळं पाहता कार्यकर्ते विरोधात गेलेले आहेत, कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे का? कारण संमिश्र प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत, ग्राउंडवर काय परिस्थिती आहे? या प्रश्नावर उत्तर देताना कैलास पाटील म्हणाले की,  ग्राउंडवरची परिस्थिती आजच आपण स्पष्ट करू शकत नाही, थोडे दिवस गेल्यानंतर स्पष्टता येईल, पण तुम्ही म्हणल्यासारखं संमिश्र प्रतिक्रिया आहेत, म्हणजे काही लोकांच म्हणणं होतं की, अजिबात केलं नव्हत पाहिजे. काही लोकांच म्हणणं होत ठीक आहे. म्हणजे असं दोन्ही संमिश्र प्रतिक्रिया पण बहुतांश कार्यकर्त्याची भावना अशी होती की हा निर्णय घ्यायला नको पाहिजे होता, आपण त्यांच्या विरोधात लढलो आणि त्यांच्या विरोधात आपल्या लोकांनी मतदान केलं तर आपण हा निर्णय घ्यायला नको होता.

Kailas Patil : ते मला संभ्रमावस्थेत वाटले

भेटल्यावर तुम्ही काय समजून सांगितलं? मित्र आणि भावासारखं तुमचं नातं आहे, प्रत्येक वेळी तुमची जोडी पाहायला मिळत होती, आज वेगवेगळे पक्ष आहेत म्हणजे जरी शिवसेना असली तरी दोन वेगवेगळे नेतृत्व आहेत, यावर कैलास पाटील म्हणाले, मी माझ्या परीने प्रयत्न केले, परंतु जोपर्यंत मी बोलत होतो, त्या दिवशी आम्ही वरुणजी आणि मी गेलो ती शेवटची भेट झाली. त्यावेळेस ते मला संभ्रमावस्थेत वाटले, ती संभ्रम अवस्था म्हणजे काय करावं, करू का नको, करावं का नाही, काय करावं काय करू नये, अशा अवस्थेत ते होते.

Kailas Patil : उद्धव साहेबांचा विचार करा…

संभ्रम अवस्थेत कैलास पाटलांनी काय समजून सांगितलं? यावरती ते म्हणाले, मी त्यावेळेस सांगितलं ठीक आहे. तुम्ही सगळ्या गोष्टीत कार्यकर्त्याच्या भावनेचा विचार करा. उद्धव साहेबांचा विचार करा, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्यांनी पण त्या बाबतीत उद्धव साहेंबाविषयी ते भावनिकच आहेत, म्हणजे त्यावेळेस बोलताना त्यांच्या बोलण्यातून जाणवलं किंवा उद्धव साहेंबाविषयी मला वाटत कसं म्हणजे कसं फेस करायचं, पण मी अजून काही ठरवलेलं नाही, मी सगळ्यांची चर्चा करून ठरवतो असं म्हणाले.

Kailas Patil : उद्याच काही सांगू शकत नाही

उद्धव ठाकरे रविवारी धाराशिवमध्ये मोठी सभा घेत आहेत, बैठक घेणार आहेत कार्यकर्त्यांची, तेव्हा एका बाजूला उद्धव ठाकरेंसोबत कैलास पाटील असतील, तर विरोधात ओमराजे निंबाळकर असतील हे अवघड आहे कैलास पाटलांसाठी? यावरती उत्तर देताना ते म्हणाले, आज उद्याचं काय होईल हे आज सांगू शकत नाही. त्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेब जो आदेश देतील, तो निर्णय देईल, त्याप्रमाणे आम्हाला वाटचाल करावी लागेल. उद्याच सांगू शकतो का? राजकारण एवढं अनिश्चित झालंय, उद्याच काही सांगू शकत नाही आपण त्यावेळेस जे होईल, उद्धवसाहेब सांगतील त्याप्रमाणे होईल, एवढं सांगतो, असंही पुढे कैलास पाटील म्हणालेत.

Kailas Patil : आपलाच मित्र आपल्या विरोधात आपल्या विरोधी पक्षात असणार…

जर उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकसभा निवडणूक कैलास पाटील यांनी लढावी यावर कैलास पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे साहेब जो आदेश देतील, तो आदेश पाळणारा हा मी त्यांचा शिवसैनिक आहे. सोशल मीडियावर चालू आहे की, पुढचे आमचे उमेदवार लोकसभेचे कैलास पाटील असतील, त्यावरती पाटील म्हणाले, हा विषय वेगळा, पक्षात निर्णय घ्यायचा अधिकार हा संपूर्णत पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा आहे, त्यावेळेस जे सांगतील त्या आदेशाप्रमाणे मी काम करीन. पण कैलास पाटलांना अवघड जाईल का कार्यकर्त्यांना समजून सांगणं काम करणं? कारण आपलाच मित्र आपल्या विरोधात आपल्या विरोधी पक्षात असणार आहे, यावरती बोलताना कैलास पाटील म्हणाले, असं काही घडलं तर निश्चितच अवघड जातं. पण आताच लगेच आपण त्याच्यावर काय होणार कसं होणार हे ठरवण्यापेक्षा थोडा काळ गेल्यानंतर काही गोष्टी स्पष्ट होतील, आणि मग आपण त्यावर बोललेलं चांगलं राहील.

Kailas Patil : कोणी कुठे रहावं हे प्रत्येक स्वतः ठरवत असतो

ओमराजेंचे चुलत भाऊ ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आहेत तर ते शिंदे शिवसेनेमध्ये आहेत,  हे किती अवघड आहे यावरती कैलास पाटील म्हणाले, नाती, मैत्री आणि राजकारण या गोष्टी वेगळ्या आहेत, प्रत्येकाला आपली आपली भूमिका असते, कोणी कुठे रहावं हे प्रत्येक स्वतः ठरवत असतो आणि तुम्ही जे सांगितलं ते सुरुवातीपासून आमच्या पक्षाचे जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुखच आहेत,  त्यांनी पक्षाचं काम करायचा निर्णय घेतलेला आहे.

Kailas Patil : ज्या पक्षाने आपल्याला संधी दिली…

2022 ला सुद्धा अशीच परिस्थिती कैलास पाटलांवर पण आली होती, तुम्ही निघाला होतात गाडीतून मग तुम्ही परत आलात उद्धव ठाकरेंसोबत आपण राहणार ही भूमिका मांडली, 40 आमदार दुसरीकडे गेले, मात्र कैलास पाटील आणि नितीन देशमुख हे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आले, काय विचार केला होता तेव्हा? यावरती कैलास पाटील म्हणाले, ज्या पक्षाने आपल्याला संधी दिली, आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून येतो, ज्या पक्षाने आपल्याला एवढी मोठी संधी दिली, त्या पक्षाबरोबर प्रामाणिक राहायचं, उद्धवजी ठाकरे साहेंबासोबत प्रामाणिक रहायचं हाच विचार त्याही वेळेस होता आणि आजही तोच विचार आहे.

Kailas Patil : त्यांना कैलास पाटलांचा 2022 ला अनुभव आलेला आहे

त्याच्यानंतर पुन्हा एकदा तिकडून बोलवणं आलं का? जसं ओमराजेंना बोलवणं आलं शिवसेनेकडून शिंदेंकडून यावरती मिश्किलपणे हसत कैलास पाटील म्हणाले, मला बोलवणंच येत नाही, कारण त्यांनी एकदा अनुभव घेतलेला आहे, जरी अनुभव घेतला आता ओमराजे निंबाळकर आल्यानंतर कदाचित कैलास पाटलांच मतपरिवर्तन होईल या प्रश्नावरती पाटील म्हणाले, त्यांना एकदा अनुभव आलेला आहे, त्यामुळे मला कोण बोलवतच नाही. अनुभव आलाय ना त्यांना कैलास पाटलांचा 2022 ला तो अनुभव त्यांना आलेला आहे, असंही ते पुढे म्हणालेत.

Kailas Patil : उद्धव ठाकरेंसोबत कैलास पाटील का आहेत?

उद्धव ठाकरेंसोबत कैलास पाटील का आहेत? त्याची दोन तीन कारणं आहेत का तुमच्याकडे? यावरती कैलास पाटील म्हणाले, मी तुम्हाला सांगितलं ना, मी एक सर्वसामान्य कुटुंबातला, शेतकरी कुटुंबातला माणूस आहे. मला जिल्हा परिषद, दोन वेळा विधानसभा, एवढी मोठी संधी, माझी कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना फक्त जी फक्त शिवसेनेत मिळू शकते, या शिवसेनेने, उद्धव ठाकरे साहेबांनी दिली, त्यामुळे त्यांच्याशी प्रामाणिक राहणं आणि ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या शिवसैनिकांनी, दिवस रात्र कष्ट करून मला प्रत्येक निवडणुकीत निवडून आणलं, यांच्याशी आपण प्रामाणिक राहणं, ही माझी प्राथमिकता आहे, त्याप्रमाणे काम करतोय असंही पुढे कैलास पाटलांनी म्हटलं आहे.

Kailas Patil : कार्यकर्त्या बैठकीनंतर ते निर्णय जाहीर झाला

ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं? तुमच्या काही कार्यकर्त्यांना त्यांनी विश्वासात घेतलं की आता ही माझी पुढची भूमिका आहे, यावरती प्रतिक्रिया देताना कैलास पाटील म्हणाले की, त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघितलं. कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर तो निर्णय जाहीर झाला, पण मध्ये काय झालं मला माहित नाही, असंही पुढे पाटील म्हणालेत. कैलास पाटील विरुद्ध ओमराजे,  परिस्थिती काय होईल, पुढे होईल, पण जर असं झालंच, तर कैलास पाटील तयार असणार का? यावरती कैलास पाटील म्हणाले, मी उद्धव ठाकरे साहेब ज्या गोष्टी सांगतील, त्या प्रत्येक गोष्टीला तयार आहे.

Comments are closed.