‘इतकी कमजोर नाही की मी राज्यसभेसाठी कोणाच्या दारावर जाईल…’, नवनीत राणा यांचं अत्यंत स्फोटक वक
राणा नाव: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी (Rajya Sabha seat) अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, राष्ट्रवादीकडून अखेर राजेंद्र जैन (Rajendra Jain) यांना उमेदवारी देण्यात आली आणि महाविकास आघाडीकडून (MVA) कोणीही अर्ज न भरल्यामुळे जैन यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान, नवनीत राणा राज्यसभेच्या तिकिटासाठी राष्ट्रवादीच्या दारात गेल्याची टीका विरोधकांकडून केली जात होती. या सर्व टीकेला नवनीत राणा यांनी आपल्या आक्रमक भाषणातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
Navneet Rana: नेमकं काय म्हणाल्या नवनीत राणा?
नवनीत राणा म्हणाल्या की, “आमच्या विरोधात सर्व नेते आहे. पण, रवी राणा चौथ्यांदा आमदार झाले आहे. राज्यसभेसाठी मी सुनेत्रा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानते. अनेक लोक माझे शुभचिंतक आहे, त्यांनी म्हटलं की, नवनीत राणा राज्यसभेसाठी NCP च्या दारात गेली, पण नवनीत राणा कोणाच्या दारात गेली नाही, मी 2024 मध्ये तिकिटासाठी पण कोणाच्या दारात गेली नाही. नवनीत राणा इतकी कमजोर नाही की, मी राज्यसभेसाठी दारावर जाईल. मी माझी विचारधारा सोडून कोठेही जाणार नाही. पद येतील, पद जातील पण माझे विचार शेवटच्या श्वासापर्यंत लढेल. मी लोकसभेसाठी पूर्ण कंबर कसली आहे, मी मैदानात उभी आहे. मी खासदार होती तेव्हा मी संसदेमध्ये अनेक विद्यार्थ्यांना नेत होती. पण, मी आता नेऊ शकत नाही, याचं दुःख आहे. अमरावती-नागपूर लवकर मेट्रो सुरू होईल. येणारं भविष्य आपलं आहे, कोणाला भविष्यासोबत खेळू देणार नाही,” असे त्यांनी म्हटले आहे.
Navneet Rana: लोकसभा निवडणुकीसाठी कसली कंबर
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे ही पोटनिवडणूक जाहीर झाली होती. महायुतीमधील जागावाटपानुसार ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्याच कोट्यात होती. या जागेसाठी नवनीत राणा यांनी नागपूर आणि मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी घेतल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, राष्ट्रवादीने ही जागा स्वतःकडेच ठेवत प्रफुल्ल पटेल यांचे खंदे समर्थक राजेंद्र जैन यांना रिंगणात उतरवले होते. नवनीत राणा यांनी या घडामोडींवर स्पष्ट केले आहे की, जरी त्यांना संधी मिळाली नसली तरी त्या पक्षाची विचारधारा सोडून कुठेही जाणार नाहीत आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी आतापासूनच कंबर कसली आहे. नवनीत राणा यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
आणखी वाचा
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Comments are closed.