‘वधू’ म्हणून माझ्या लग्नात नेसलेली पैठणी ‘नवरीची आई’ म्हणून परिधान करण्याचा योग: सुप्रिया सुळे
मुंबई : खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट चर्चेत आहे. सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची कन्या रेवती हिचे लग्न 20 जूनला नागपूरचे उद्योजक सारंग लखानी यांच्यासोबत झाले. या लग्नसोहळ्यात सुप्रिया सुळे यांनी परिधान केलेल्या पैठणीची गोष्ट सांगितली आहे. सुप्रिया सुळे यांनी 35 वर्षांपूर्वी 4 मार्च 1991 ला वधू म्हणून स्वत:च्या लग्नात नेसलेली पैठणी नवरीची आई म्हणून रेवती आणि सारंग यांच्या विवाहसोहळ्यात पुन्हा परिधान करण्याचा योग आल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
सुप्रिया सुळे: सुप्रिया सुळे यांची सोशल मीडिया पोस्ट
मुलांचं लग्न हा प्रत्येक आई-वडिलांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो. सुमारे ३५ वर्षांपूर्वी, ४ मार्च १९९१ रोजी ‘वधू’ म्हणून माझ्या लग्नात नेसलेली पैठणी ‘नवरीची आई’ म्हणून रेवती आणि सारंग यांच्या २० जून रोजी झालेल्या विवाहसोहळ्यात पुन्हा परिधान करण्याचा योग आला.
ही पैठणी छत्रपती संभाजीनगर येथील विणकर बशीरजी यांनी अत्यंत कौशल्याने विणलेली आहे. ती पुन्हा नेसताना अनेक आठवणी जाग्या झाल्या आणि आनंदात आणखी भर पडली.
काही गोष्टींचं सौंदर्य काळानुसार अधिकच खुलत जातं. या पैठणीत केवळ रेशमाचे धागे नाहीत, तर आठवणी, संस्कृती आणि आपल्या कारागिरांच्या कष्टांची समृद्ध परंपरा विणलेली आहे. म्हणूनच ही साडी नेसताना मी कारागिरांच्या अविश्रांत मेहनतीप्रती कृतज्ञ आहे. काही गोष्टींचं मोल कशातही चुकविता येत नाही, हेच खरं
आमच्या आयुष्यातील हे क्षण अधिक सुंदर करणाऱ्या सर्व प्रतिभावान विणकरांचा अतिशय अभिमान आहे.
रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाहाला मान्यवरांची उपस्थिती
सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे आणि नागपूरमधील अरुण लखानी यांचे पुत्र सारंग लखानी यांचा विवाह सोहळा 20 जूनला मुंबईत मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या लग्न सोहळ्याला देशभरातील राजकीय क्षेत्रातील नेते, उद्योग विश्वातील मान्यवर उपस्थित होते. विविध राज्यांचे मुख्यमंत्री देखील या लग्न सोहळ्याला उपस्थित होते. राहुल गांधी, मल्लिकार्जून खरगे, डी.के. शिवकुमार यांच्यापासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरे, उद्योजकांमध्ये गौतम अदानी, मुकेश अंबानी यांच्यासह इतर निमंत्रित उपस्थित होते.
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Comments are closed.