शिंदेंच्या आमदाराने व्यावसायिकाकडे 40 लाख मागितले, ठाकरे सेनेचा सर्वात मोठा ट्रॅप
कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर (MLA Rajesh Kshirsagar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. इंगवले यांनी राजेश क्षीरसागर यांच्यावर भ्रष्टाचार आणि लाचखोरीचे गंभीर आरोप केले आहेत. क्षीरसागर यांनी एका व्यावसायिकाकडून तब्बल 40 लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासंदर्भातील पैशांच्या कथित देवाण-घेवाणीच्या संभाषणाचा व्हिडिओ पत्रकार परिषदेत प्रसारित करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही इंगवले यांनी केली.
आमदार राजेश क्षीरसागर यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आली नाही
दरम्यान, या आरोपांवर आमदार राजेश क्षीरसागर यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप करत, एका व्यावसायिकाकडून 40 लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा दावा केला. या व्यवहारासंदर्भातील कथित संभाषणाचा व्हिडिओ त्यांनी पत्रकारांसमोर सादर केला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, या आरोपांबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांची बाजू अद्याप समोर आलेली नाही.
आमदार राजेश क्षीरसागर यांच्या बद्दलच्या व्हिडिओची शहानिशा व्हायला हवी : आमदार सतेज पाटील
शिवसेनेचे आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला हा व्हिडिओ मीही पाहिला आहे. असा व्हिडिओ समोर येत असेल तर त्याची शहानिशा करून तात्काळ चौकशी करावी अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली आहे.
रविकिरण इंगवले हा ब्लॅकमेलर : ऋतुराज क्षीरसागर यांची टीका
आमदार राजेश क्षीरसागर यांचा व्हिडिओ व्हायरल करण्यामध्ये काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा हात असल्याची प्रतिक्रिया आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी दिली आहे. त्यांनी एक पत्रक काढलं आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी हाच व्हिडिओ त्यांनी प्रसिद्ध केला होता. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती. मुळात रविकिरण इंगवले हा ब्लॅकमेलर असल्याची टीका ऋतुराज क्षीरसागर यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
पाचशे एकराचा आरोप करूनही राजेश क्षीरसागर बिंदू चौकात फिरलकेच नाहीत; म्हणाले, राजू शेट्टींनी मला दातृत्व शिकवू नये
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा ‘तो’ जुना व्हिडिओ
Comments are closed.