लाल किल्ला प्रकरणातील तीन नवे आरोपी.

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

नोव्हेंबर 2025 मध्ये झालेल्या दिल्लीतील लाल किल्ला स्फोट प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकरणाने (एनआयए) अतिरिक्त आरोपपत्र सादर केले आहे. या आरोपपत्रात आणखी तीन आरोपींची नावे जोडण्यात आली आहेत. या तीन आरोपींपैकी एक सध्या फरार आहे. नव्या आरोपींची नावे झमीर अहमद अहंगेर, तुफेल अहमद भट आणि मुझफ्फर अहमद अशी आहेत. त्यांच्यापैकी अहमत हा सध्या फरार म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. हे सर्व आरोपी मूळचे जम्मू-काश्मीरमधील आहेत. या प्रकरणातला मुख्य आरोपी डॉ. उमर उन नबी हा आहे.

आतापर्यंत या प्रकरणात दोन आरोपपत्रे सादर करण्यात आली असून एकंदर 13 व्यक्ती आरोपी म्हणून नोंद करण्यात आल्या आहेत. सध्या फरार असणारा अहमद हा देखील या कटाच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक आहे. तसेच बाँब बनविण्यात त्याची भूमिका महत्वाची आहे, असे एनआयएने स्पष्ट केलेले आहे. या हल्ल्याचा कट 2022 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये शिजला. तथापि, त्याचा सुगावा लागल्याने तो वेळीच उघडकीस आणला गेला. पण डॉ. उमर उन नबी हा त्यावेळी एनआयएसच्या कचाट्यातून सुटला. तो कारने बाँब पळवून नेत असताना लाल किल्ल्यानजीक थांबला. त्याने कारबाहेर पडून बाँबचा स्फोट घडविला. या प्रकरणातल्या फरारी आरोपीच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरट काढलेले आहे.

Comments are closed.