रुग्णालयात आईने सोडले प्राण, विरहाच्या दुःखातून काही तासांतच तरुण मुलानेही संपवली जीवनयात्रा; प

गुन्हे बातम्या ठेवा: पुण्यातील (Pune) पर्वती दर्शन परिसरातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू असलेल्या आईचे निधन झाल्याचा धक्का सहन न झाल्याने, एका 25 वर्षीय तरुणाने शनिवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. आईच्या विरहाने खचून जात मुलाने हे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्दैवी घटनेनंतर माय-लेकांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबावर आली. मंदा दोडके (वय 50) आणि साहिल गणेश दोडके (वय 25, रा. पर्वती दर्शन, पुणे) अशी या मृत पावलेल्या माय-लेकाची नावे आहेत.

Pune Crime News: चार बहिणींचा एकुलता एक भाऊ होता साहिल

दोडके कुटुंब हे मूळचे पुण्याच्या दांडेकर पूल परिसरातील रहिवासी आहे. मात्र, तिथे सध्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे काम सुरू असल्याने, हे कुटुंब काही दिवसांपूर्वीच पर्वती दर्शन परिसरात भाड्याच्या घरात राहायला आले होते. मृत मंदा दोडके या वृद्ध रुग्णांची सेवाशुश्रूषा करून कुटुंबाला हातभार लावायच्या. चार बहिणींनंतर जन्माला आलेला साहिल हा घरातील एकुलता एक मुलगा होता. पहाटे उठून लोकांच्या घरी दुधाच्या पिशव्या टाकणे आणि दिवसभर लिफ्ट दुरुस्तीची कामे करणे, असा कष्टाळू दिनक्रम सांभाळून तो कुटुंबाची जबाबदारी सांभाळत होता.

Pune Crime News: चहा घेऊन रुग्णालयात पोहोचला, पण…

मंदा दोडके यांना गुरुवारी पहाटे अचानक अर्धांगवायूचा तीव्र झटका आला होता. साहिलने त्यांना तातडीने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती सातत्याने खालावत चालली होती. शनिवारी सकाळी साहिल नेहमीप्रमाणे आपल्या आईसाठी चहा घेऊन रुग्णालयात गेला होता. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या आईचे निधन झाल्याची हृदयद्रावक बातमी त्याला दिली.

Pune Crime News: दुःखातून साहिलने जीवनयात्रा संपवली

डोळ्यांसमोरून आईचे छत्र हरपल्याने आणि आईला वाचवू न शकल्याच्या प्रचंड दुःखातून साहिल पूर्णपणे खचून गेला. मानसिक धक्का सहन न झाल्याने त्याने रुग्णालयातून तातडीने घर गाठले. घरात कोणीही नसताना त्याने गळफास लावून घेत टोकाचे पाऊल उचलले. एकाच वेळी आई आणि तरुण मुलगा गमावल्याने दोडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पर्वती पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Pune Accident News: पुण्यात भीषण अपघात, राजगड किल्ल्याकडे चाललेली ट्रॅव्हल्स पाबे घाटात दरीत कोसळली; मुंबईतील दोन पर्यटकांचा मृत्यू

Comments are closed.