पुण्यात भीषण अपघात, राजगड किल्ल्याकडे चाललेली ट्रॅव्हल्स पाबे घाटात दरीत कोसळली; मुंबईतील दोन प

पुणे अपघात बातम्या: पुणे जिल्ह्यातील पाबे घाटात (Pabe Ghat) एक अत्यंत भीषण अपघात (Accident) घडला आहे. ऐतिहासिक राजगड किल्ला (Rajgad Fort) पाहण्यासाठी मुंबईहून निघालेल्या पर्यटकांची ट्रॅव्हल्स बस पाबे घाटातील खोल दरीत कोसळली आहे. या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Pune Accident News: मुंबईच्या अंधेरीतील ग्रुपवर काळाचा घाला

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी (Andheri) परिसरातून 20 जणांचा एक ग्रुप ट्रॅव्हल्स बसने राजगड किल्ला पाहण्यासाठी निघाला होता. सर्व पर्यटक उत्साहात गडकिल्ले भटकंतीसाठी निघाले असतानाच, पुणे जिल्ह्यातील वेल्हा आणि हवेली तालुक्याला जोडणाऱ्या पाबे घाटात त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. पाबे घाटात ट्रॅव्हल्स चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ही बस थेट खोल दरीत कोसळली.

Pune Accident News:  दोघांचा मृत्यू, हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमकडून रेस्क्यू ऑपरेशन

या ट्रॅव्हल्स बसमध्ये एकूण 20 प्रवासी होते. दरीत कोसळताच गाडीचा मोठा चक्काचूर झाला. या दुर्घटनेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर काही प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले. रेस्क्यू टीमने अत्यंत शर्थीचे प्रयत्न करून दरीत अडकलेल्या इतर प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले आहे. सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

Ketan Agrawal Pune Lohagad Case: केतनला दरीत कसं ढकललं?; सिया आणि चेतनने लोहगडावर सीन रीक्रिएशन करुन दाखवलं, पहिले फोटो समोर

Ketan Agrawal Death Case : “45 वर्षांची ओळख होती म्हणून जास्त चौकशी केली नाही”; केतनच्या आजोबांनी सांगितली लग्न जमवण्याआधी केलेली ‘ती’ मोठी चूक

Comments are closed.