Ketan Agrawal Death : “लगेच लग्न केलं तर संशय येईल…”; केतन अग्रवालला संपवल्यानंतर तब्बल 3 वर्ष थांबण्याचा होता सिया-चेतनचा ‘मास्टरप्लॅन’! सगळं ठरलेलं पण…

पुणे: लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवे आणि थरारक खुलासे होत आहेत. मुख्य आरोपी सिया गोयल (Ketan Agrawal Death) आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केवळ हत्येचाच कट रचला नव्हता, तर हत्येनंतर पोलिसांच्या संशयापासून कसे वाचायचे, याचेही अत्यंत चतुर (Ketan Agrawal Death) नियोजन केले होते. पोलिसांच्या तांत्रिक तपासात या दोघांच्या ‘मास्टरप्लॅन’चा धक्कादायक पर्दाफाश झाला आहे.(Ketan Agrawal Death)

Ketan Agrawal Death :   संशय टाळण्यासाठी थेट ‘थ्री-इयर प्लॅन’

केतनचा काटा काढल्यानंतर लगेच लग्न केल्यास पोलिसांना आणि कुटुंबियांना थेट संशय येईल, याची सिया आणि चेतनला पूर्ण जाणीव होती. त्यामुळेच या दोघांनी हत्येनंतर लगेच एकत्र न येता, तब्बल दोन ते तीन वर्षे थांबून मगच लग्न करण्याचे ठरवले होते. इतकेच नव्हे तर, पोलिसांच्या हाती कोणताही डिजिटल पुरावा लागू नये म्हणून व्हॉट्सॲपवरील कोणते मेसेज डिलीट करायचे आणि कोणते ठेवायचे, याची स्क्रिप्ट त्यांनी आधीच ठरवली होती. त्यानुसार त्यांनी मेसेजची पूर्ण काळजी घेतली होती.

हा संपूर्ण गुन्हा अपघाताचा वाटावा असा आरोपींचा प्रयत्न होता आणि अटकेनंतरही ते पोलिसांची दिशाभूल करत होते. मात्र, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक (SP) संदीपसिंग गिल यांनी या प्रकरणाचा सखोल अभ्यास केला. पोलिसांनी आरोपींचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR), मोबाईल लोकेशन्स आणि त्यांच्या भेटीच्या ठिकाणांची तांत्रिक माहिती गोळा केली. या भक्कम तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांना या गुंतागुंतीच्या कटाचा उलगडा करण्यात यश आले.

Ketan Agrawal Death :  एवढा मोठा गुन्हा, पण सियाच्या डोळ्यात पाण्याचा थेंबही नाही!

या प्रकरणातील सर्वात थक्क करणारी आणि अंगावर काटा आणणारी बाब म्हणजे, ज्या तरुणाशी लग्न ठरणार होते त्याचा इतक्या क्रूरपणे बळी घेऊनही मुख्य आरोपी सिया गोयल हिला या कृत्याचा कोणताही पश्चात्ताप झालेला नाही. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एवढा मोठा गुन्हा उघडकीस आल्यानंतर आणि अटक झाल्यानंतरही सिया पोलीस कोठडीत एकदाही रडलेली नाही. तिच्या चेहऱ्यावर भीती किंवा पश्चात्तापाचा लवलेशही नसल्याने पोलीस अधिकारीही चक्रावून गेले आहेत.या प्रकरणात पोलीस आता अधिक तांत्रिक पुरावे गोळा करत असून, न्यायालयात भक्कम बाजू मांडण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे.

Ketan Agrawal Death :  डमी पुतळ्याच्या साहाय्याने घटनाक्रम उलगडला

१८ जून रोजी घडलेल्या या थरारक घटनेचा गुंता सोडवण्यासाठी पोलीस आपल्यासोबत एक ‘डमी पुतळा’ (मानवी आकाराची प्रतिकृती) घेऊन लोहगडावर पोहोचले होते. केतन अग्रवाल याला नेमके कशा प्रकारे दरीत ढकलले गेले, याचा सिलसिलेवार तपास करण्यासाठी या डमी पुतळ्याची मदत घेण्यात आली. आरोपी सिया गोयल हिच्या उपस्थितीत पोलिसांनी कड्यावरून हा डमी पुतळा खाली ढकलून संपूर्ण घटनाक्रमाचे अत्यंत बारीकीने पुनरावलोकन केले.

Ketan Agrawal Death :  सकाळी ८ वाजता मोहीम; पर्यटकांसाठी किल्ला बंद

रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास पोलिसांचे पथक सिया गोयलला घेऊन लोहगड किल्ल्यावर पोहोचले. सुमारे अडीच तास म्हणजेच सकाळी १०:३० वाजेपर्यंत घटनास्थळावर ही तपास प्रक्रिया आणि पाहणी सुरू होती. या क्राईम सीन रिक्रिएशनदरम्यान कमालीची गुप्तता आणि सुरक्षेची काळजी घेण्यात आली होती. तपास सुरू असेपर्यंत लोहगड किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. या काळात कोणत्याही पर्यटकाला किंवा सर्वसामान्य नागरिकाला किल्ल्यावर प्रवेश दिला गेला नाही.

Comments are closed.