संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंचं पटत नाही, मी पुढे बोलत नाही पण…

परभणी :  खासदार फुटल्यानंतर आता शिवसेना ठाकरेंच्या पक्षाला संघटनात्मक पातळीवर अजून फटके बसू नयेत, म्हणून उद्धव ठाकरे डॅमेज कंट्रोलच्या मोडमध्ये आले आहेत. ज्या लोकसभा मतदारसंघातील खासदार फुटले त्या ठिकाणचा दौरा उद्धव ठाकरे यांनी सुरु केला आहे. याची सुरुवात ईशान्य मुंबईचे खासदार संजय पाटील यांच्या लोकसभा मतदारसंघापासून केली आहे. उद्धव ठाकरे आता परभणी दौऱ्यावर जाणार आहेत. ठाकरे गटाचे जे सहा खासदार फुटले त्यात परभणीचे संजय जाधवही (Sanjay Jadhav)आहे. संजय जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या अनुषंगाने त्यांनी परभणीत बैठक घेतली त्याचबरोबर परभणीच्या पाथरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या लोकार्पण प्रसंगी बोलताना खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे आले तर त्यांचे स्वागत असल्याचं म्हटलं आहे.(Sanjay Jadhav) तर खासदार संजय राऊतांच्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं आहे.

Sanjay Jadhav : उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर काही बोलणार नाही

पाथरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी बोलताना संजय जाधव म्हणाले की, हा पुतळा उभारावा अशी अनेक वर्षापासूनची पाथरीकरांची मागणी होती, आंदोलन देखील येथे झाली, त्यानंतर सईद खान यांनी पुढाकार घेत अश्वारूढ पुतळ्याची उभारणी झाली, सईद खान यांचं मी अभिनंदन करतो, तर ठाकरेंच्या दौऱ्याबाबत बोलताना ते म्हणाले की, ते शिवसेनेचे नेते आहेत, उद्धव ठाकरे मेळाव्यासाठी आले तर त्यांचे स्वागत आहे. उद्धवसाहेब काय बोलले याकडे आम्ही लक्ष देणार नाही, मी ठरवलेलं आहे, उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर काही बोलणार नाही, असंही ते म्हणालेत..(Sanjay Jadhav)

Sanjay Jadhav : संजय राऊत बेईमान माणूस आहे उद्धव ठाकरेंचा पक्ष संपवायला..

तर संजय राऊत यांनी संजय जाधव यांच्यावरती टीका केली, यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, संजय राऊत म्हणजे अशी म्हण आहे हम तो इतने बेशरम है, के शरम भी हमसे शर्माती है, खासदार राऊत म्हणतात मी दारू पीत बसलो होतो विमानात, संजय राऊत यांनी सांगावं मी त्यांच्या घरी कधी पाणी सुद्धा पिले का,  मीच दोन  वेळा तुम्हाला सामना कार्यालयात बातम्या तयार करताना पिवळा पाणी पिताना पाहिले, संजय राऊत यांना लेकरांची शपथ घेऊन सांगावे, मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो, मी कधी दारू बाटली हातात नाही, दिवसभर उपाशी असल्याने विमानात ठेवलेले बदाम खात होतो, विमानात दारू नेता येते का?, ते सुद्धा विमानात प्रवास करतात त्यांना माहिती आहे, संजय राऊत बेईमान माणूस आहे उद्धव ठाकरेंचा पक्ष संपवायला कोणी कारणीभूत असेल तर संजय राऊत आहे, संजय राऊत आणि उद्धव साहेबांचं पटत नाही, मी पुढे काही बोलत नाही, मात्र उद्धव ठाकरे यांना नुकसान कसं होईल, यासाठी राऊत काम करतात, असंही ते म्हणालेत.

Comments are closed.