मुंबईत बनावट जन्मदाखला रॅकेटचा पर्दाफाश! बोरिवली पोलिसांकडून 25 वर्षीय तरुणाला अटक
मुंबई : मुंबईत बनावट जन्मदाखला (Fake birth certificate) रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. बोरिवली पोलिसांकडून 25 वर्षीय BSc IT ड्रॉपआऊट तरुणाला अटक करण्यात आली आहे. AI च्या मदतीने बनावट सरकारी पोर्टल तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. Gemini AI चा वापर करून बनावट जन्मदाखले तयार केल्याची माहिती समोर आली आहे. QR कोडसह सरकारी जन्मदाखल्यांसारखी कागदपत्रे तयार करण्यात आली आहेत.
डिसेंबर 2025 पासून बनावट पोर्टलद्वारे फसवणूक सुरु असल्याची माहिती उघड
डिसेंबर 2025 पासून बनावट पोर्टलद्वारे फसवणूक सुरु असल्याची माहिती उघड झाली आहे. एका दस्तऐवज सेवा केंद्र चालकाला पोर्टलची लॉगिन आयडी विकली होती. जन्मदाखल्यासाठी 149 ते 300 रुपये शुल्क आकारल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. बीएमसी पडताळणीत चारही जन्मदाखले बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपीने आतापर्यंत सुमारे 40 बनावट जन्मदाखले तयार केल्याची कबुली दिली आहे. आरोपी मोठ्या सायबर रॅकेटमधील सब-एजंट असल्याचा पोलिसांना संशय आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बोरिवली पोलीस करत आहेत.
कृषीमित्र भरतीच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणुकीचा आरोप
छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी संस्थेमार्फत ‘कृषी मित्र’ पदासाठी जळगावसह राज्यभर परीक्षा आयोजित करण्यात आली होती. जळगावातील एका महाविद्यालयात जिल्हाभरातील 350 हून अधिक विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित राहिले. मात्र परीक्षास्थळी हॉलतिकीट न देता, ऑनलाइन अर्ज करताना सांगितलेले 25 हजार मानधन नाकारण्यात आल्याचा आणि त्याऐवजी कृषी उत्पादन विक्री करून कमिशन मिळेल, अशी माहिती देण्यात आल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केला. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यास नकार देत भरलेली परीक्षा फी परत मिळावी आणि संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत गोंधळ घातला. या घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिसांसह जिल्हा कृषी विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रक्रियेत महाराष्ट्र शासनाच्या नावाचा गैरवापर झाला आहे का, याची पडताळणी केली जात असून संबंधित कागदपत्रे मागविण्यात आली आहेत.
कागदपत्रे बनावट आढळल्यास कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात येणाआणि
कागदपत्रे बनावट आढळल्यास कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांनी फसवणुकीबाबत स्वतंत्रपणे पोलिसांत तक्रार दाखल करावी, असेही सांगण्यात आले. दरम्यान, संबंधित कंपनीच्या समन्वयकाला चौकशीसाठी पोलिसांनी पोलिस स्थानकात बोलावले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, जिल्हा देखील विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती.
Anandache Paan : ‘खोचक रेषा’ या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Comments are closed.