IND vs IRE: टी20 मध्ये पदार्पण करून देणारा भारत ठरला दुसरा देश! जाणून घ्या नंबर-1 वर कोण आहे?
आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने एक नवा इतिहास रचला आहे. या सामन्यातून सूर्यांश शेडगे (Suryansh shedge & Prince Yadav) आणि प्रिंस यादव यांनी भारतासाठी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. भारताकडून टी20 मध्ये पदार्पण करणारे हे अनुक्रमे 120 वे आणि 121 वे खेळाडू ठरले आहेत.
टी20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी देणाऱ्या देशांच्या यादीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सूर्यांश शेडगेला नितीश कुमार रेड्डीच्या बदली खेळाडू म्हणून आर्यलंड मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले होते, तर प्रिंस यादवने काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानविरुद्ध एकदिवसीय (ODI) क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक खेळाडूंना पदार्पण करून देण्याचा जागतिक विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे.
सूर्यांश शेडगे आयपीएल 2026 मध्ये पंजाब किंग्ससाठी खेळतो आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो मुंबईचे प्रतिनिधित्व करतो. प्रिंस यादव आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्ससाठी खेळतो. त्याने अलीकडेच अफगाणिस्तानविरुद्धच्या 2 वनडे सामन्यांत एकूण 3 विकेट्स घेतल्या होत्या.
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटच्या इतिहासात पाकिस्तानने आतापर्यंत सर्वाधिक 125 खेळाडूंना पदार्पण करून दिले आहे. या बाबतीत भारत दुसऱ्या स्थानी असून, सूर्यांश आणि प्रिंसच्या समावेशानंतर भारतासाठी पदार्पण करणाऱ्या खेळाडूंची संख्या 121 झाली आहे.
सूर्यांश आणि प्रिंसच्या आधी हर्षित राणा हा भारतासाठी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा शेवटचा खेळाडू होता. त्याने जानेवारी 2025 मध्ये इंग्लंडविरुद्ध पदार्पण केले होते आणि त्यानंतर त्याने 10 टी20 सामने खेळले आहेत. हर्षितच्या पदार्पणानंतर तब्बल 513 दिवसांनी भारताने नवीन खेळाडूंना टी20 पदार्पणाची संधी दिली आहे.
Comments are closed.