धक्कादायक! रस्त्यावर चालताना धक्का लागला म्हणून 35 वर्षाच्या तरुणावर थेट हल्ला, उपचार सुरु
मुंबई माहीम क्राईम न्यूज: मालाडमध्ये लोकल ट्रेनमध्ये किरकोळ कारणावरून चाकू हल्ल्याची घटना ताजी असतानाच मुंबईच्या माहीम (मुंबई गुन्हे परिसरात देखील किरकोळ कारणावरुन चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना माहीम रेल्वे स्टेशनच्या शेजारी सेनापती बापट मार्गवर घडली आहे. दोन दिवसापूर्वी रस्त्यावर चालत जात असताना धक्का लागला म्हणून एका व्यक्तीने थेट चाकू हल्ल्या केल्याचा धक्कादाय घटना घडली आहे. या चाकू हल्ल्यात 35 वर्षाच्या तरुण नवीन प्रसन्न हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर त्याला लगेच सायन रुग्णालयमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
आरोपी विरुद्ध माहीम पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
चाकू हल्ल्या केल्यानंतर आरोपी हा फरार झाला आहे. आरोपी विरुद्ध माहीम पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करुन वेगवेगळ्या सीसीटीव्ही फुटेज त्याच सोबत तांत्रिक तपास करून वडाळा परिसरामधून आरोपीला अटक केली आहे. अटक आरोपीचे नाव अनस नईम खान वय 19 वर्ष असून तो वडाला परिसरा मधला राहणार आहे. आरोपी हा माहीम परिसरात फिरण्यासाठी आला होता त्याच दरम्यान त्याला जखमी व्यक्तीचा धक्का लागला आहे. या धक्क्यात आरोपीचा मोबाईल खाली पडला याचाच राग धरुन आरोपी हा शिवीगाळ करत थेट खिशातून चाकू काढून फिर्यादीवर चाकू हल्ला केला आहे. या आरोपीला माहीम पोलिसांनी अटक केल्यानंतर आज हॉलिडे कोर्टात हजर केले होते, कोर्टामधून 7 दिवसाची पोलीस कोठडी भेटली. आरोपी हा खिशात चाकू घेऊन का फिरत होता त्याचे उद्देश काय होता या संदर्भात अधिक तपास माहीम पोलिसांकडून सुरू आहे.
उल्हासनगर रेल्वे स्टेशनजवळ एका तरुणावर टोळीकडून जीवघेणा हल्ला
उल्हासनगर रेल्वे स्टेशनजवळील अल्बर्ट पार्किंग परिसरात एका तरुणावर टोळीकडून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित गायकवाड या तरुणावर काही जणांनी एकत्र येत हल्ला केला. हल्ल्यादरम्यान तरुणाला मारहाण करण्यात आली असून या घटनेनंतर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस पुढील तपास करत असून हल्ल्यामागील कारण आणि आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
Anandache Paan : ‘खोचक रेषा’ या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Comments are closed.