टी-20 विश्वचषकात भारताची निराशाजनक एक्झिट! कांगारूंनी दाखवला बाहेरचा रस्ता

ICC WOMEN’S T20 WORLD CUP 2026: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDW vs AUSW) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाचा दारुण पराभव झाला. कांगारुंनी टीम इंडियाला 6 विकेट्स आणि 6 चेंडू राखून धूळ चारली. स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी (Do Or Die Match) टीम इंडियासाठी हा सामना करा किंवा मरा अश्या स्थितीत होता. या पराभवासह टीम इंडियाचा स्पर्धेतील प्रवास लीग स्टेजमध्येच संपला. भारतीय संघाने पहिल्या डावात खेळताना मर्यादित 20 षटकात 4 विकेट्स गमावून 170 धावा केल्या ज्यामध्ये कर्णधार हरमनप्रीत काैरने शानदार अर्धशतक झळकावले. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाने 19व्या षटकात लक्ष्य गाठले.

नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने सावध सुरुवात केली. ज्यामध्ये 9.1 षटकात सलामी जोडीने 66 धावांची निर्णायक भागीदारी केली. सुरुवात थोडी स्लो असली तरी भारताने सुरुवातीला विकेट दिले नाही. मात्र 9व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शेफाली वर्मा बाद झाली. तिने 34 धावांचे योगदान दिले. त्यानंतर स्मृती मानधना देखील 11.3 षटकात धावबाद झाली. ज्यामुळे भारताची 83-2 अशी अवस्था झाली. मधल्या फळीत भारताने लय गमावली. याचाच फायदा घेत ऑस्ट्रेलियाने सामन्यात कमबॅक केले.

तिसऱ्या क्रमांकावार आलेल्या जेमिमाने 34 धावा केल्या पण तिला रिटायर्ड हर्ट करण्यात. तिच्या जागी रिचा घोषला फलंदाजीला पाठवण्यात आले. पण तीची ही निराशा झाली. केवळ 1 धाव करुन रिचा बाद झाली. दरम्यान, चाैथ्या नंबरवर फलंदाजीला आलेल्या कर्णधार हरमनप्रीत काैरने मात्र आक्रमक फलंदाजी केली. तिने 27 चेंडूत 66 धावा केल्या, तिच्या या खेळीमुळे भारताने 170 धावांचा समाधानकारक टप्पा गाठला. ऑस्ट्रेलियाकडून सोफी मोलिन्यूक्सने 2 विकेट्स घेतल्याा.

लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला पहिल्या षटकात मोठा धक्का बसला, रेणूका ठाकूरने जाॅर्जिया वाॅल दुसऱ्या चेंडूवर एलबीडब्ल्यू केले. यानंतर बेथ मुनी आणि फीबी लिचफील्ड यांनी 50 धावांची भागीदारी करत संघाला स्थिर सुरुवात करुन दिली. पाॅवरप्लेच्या नंतरच्या पहिल्याच षटकात 54 धावांवर संघाला दुसरा झटका बसला. जेव्हा श्रीचरणीने लिचफील्डला (24) माघारी पाठवले. त्यानंतर 9.1 षटकात बेथ मुनी (22) देखील बाद झाली. झटपट दोन विकेट घेऊन भारताने सामन्यात कमबॅक केले. पण यानंतर एलिस पेरी आणि गार्डनरची अनुभवी जोडी मैदानात होती. या दोघींनी आपल्या अनुभवाचा वापर करत टीम इंडियाच्या हातातील सामना हिसकावून घेतला.

या जोडीने आक्रमक फलंदाजी करत सामना ऑस्ट्रेलियाचा बाजूने झुकवला. ज्यामध्ये दोघींनी अर्धशतक झळकावले. पेरीने 38 चेंडूत 56 तर गार्डनरने 29 चेंडूत 53* धावा केल्या आणि सामना सहज जिंकवला. या पराभवासह टीम इंडियाचा प्रवास लीग स्टेजमध्ये संपला.

Comments are closed.