डॅमेज कंट्रोलपासून ते ऑपरेशन देवेंद्र फडणवीसपर्यंत…, उद्धव ठाकरेंनी विदर्भ अन् मराठवाड्याच्या

उद्धव ठाकरे यांची शिर्डी भेट राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या आणि शिवसेना (shivsena) पक्षात झालेलं दुसरं सर्वात मोठं बंड म्हणजे ऑपरेशन टायगरची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. त्यावरून राजकारणहे कमवाघेतलाf तापलं आहे. एकीकडे एकनाथ शिंदेंच्या (मराठी) नेतृत्वात ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदार फोडण्यात आले असून त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेशही झालाहे. उद्धव ठाकरेंना दुसऱ्यांदा एकनाथ शिंदेंकडून हा मोठा धक्का देण्यात आलाय. त्यामुळे, उद्धव ठाकरेंनी 6 फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा सुरू करत संबंधित खासदारांवर जोरदार हल्लाबोल केलाय. दरम्यानउद्धव ठाकरेंच्या या तीन दिवसाच्या दौऱ्याचा आज शेवटचा दिवस. उद्धव ठाकरे हे फुटलेले खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिर्डी मतदारसंघात आज मेळावा घेणार आहे.

दरम्यानमागील दोन दिवसापासून उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षातून फुटलेल्या सहा खासदारांच्या मतदारसंघात जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधला. खासदार फुटले, कार्यकर्ता शिवसैनिक आपल्या सोबत आहेहे दाखवण्यासाठी परभणी हिंगोली धाराशिवमध्ये मोठे शक्ती प्रदर्शन ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलंय.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी विदर्भ अन् मराठवाड्याच्या दौऱ्याते नेमकं कोणत्या गोष्टींवर भर दिला?

खासदारांसोबत इतर महत्त्वाचे पदाधिकारी शिंदे शिवसेनेत जाऊ नये, यासाठी शिवसैनिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आणि डॅमेज कंट्रोलसाठी संजय राऊत, अरविंद सावंत, अंबादास दानवे, अनिल देसाई, चंद्रकांत खैरे या ठिकाणचे सर्व स्थानिक आमदार यांसारख्या नेत्यांची फौज घेऊन उद्धव ठाकरे या दौऱ्यात मैदानात उतरले आहे. प्रामुख्याने उद्धव ठाकरेंनी आपल्या या विदर्भ-मराठवाड्यात नेमक्या कोणत्या गोष्टींवर भर दिल्याचा पाहायला मिळालं, हे आपण जाणून घेऊया.

1. डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न –

खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंचा त्यांच्या फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात तातडीने दौरा करत आपला कार्यकर्ता, आपला शिवसैनिक सोबत ठेवण्यासाठीचा प्रयत्न करत शिवसेना यांच्या मतदारसंघात लढत राहणार असल्याचा विश्वास शिवसैनिकांमध्ये निर्माण केला. सोबतच त्यातून डॅमेज कंट्रोलचाहे प्रयत्न केला.

2. खासदार का सोडून गेले? खासदारांवर हल्लाबोल

सहा खासदार फुटून का गेले? निधीसह इतर जी कारण खासदारांनी सांगितले की पूर्णपणे अशी चुकीची आहे ही शिवसैनिकांना पटवून देत खासदार स्वतःच्या स्वार्थासाठी केल्याचं शिवसैनिकांना सांगत या खासदारांच्या विरोधात पुढील तीन वर्ष लढण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या आहेत

3. खासदार फुटल्यानंतर संघटना मजबूत ठेवण्यासाठी स्थानिक आमदारांवर जबाबदारी

परभणीत खासदार संजय जाधव फुटल्यानंतर आता आमदार राहुल पाटील यांना एक प्रकारे पक्षाची ताकद देत पक्ष संघटना टिकून ठेवण्याची जबाबदारी दिली. तर धाराशिव मध्ये खासदार ओमराजे निंबाळकर फुटल्यानंतर त्या ठिकाणी आमदार कैलास पाटील यांना अधिक ताकद देत धाराशिवमध्ये शिवसैनिकांना संघटित ठेवण्याच्या सूचना दिल्या.

4. आमदारफुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदारांवर संघटनेची जबाबदारी –

खासदार फुटीनंतर आमदार फुटीच्या चर्चा असताना एक प्रकारे आपल्या आमदारांना उद्धव ठाकरेंनी पुढे करत त्या त्या मतदारसंघातील आमदारांना एकप्रकारे संघटना टिकून ठेवण्याची जबाबदारी या दौऱ्यात दिल्याचे दिसत आहे

5. ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन देवेंद्र फडणवीस, भाजपमधील गटबाजी वर भाष्य –

हे ऑपरेशन टायगर” नाही तर “ऑपरेशन देवेंद्र” म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजप पक्षात गटबाजी सुरू असल्याचं सांगत अमित शाह यांना पंतप्रधान व्हायचय यासाठी देवेंद्र फडणवीस यांना बॅकफूटवर टाकण्यासाठी आपले ६ खासदार भाजपमध्ये न जाता शिंदे शिवसेनेत पाठवले… असं आपलं मत सभांमध्ये मांडलं

6. राम मंदिर चोरीचा मुद्दा भाजपवर टीकेचे बाण –

या सगळ्या मेळाव्यांमध्ये पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा समोर काढत अयोध्या राम मंदिर चोरीचा मुद्दा मांडत भाजपवर हल्लाबोल केला

Comments are closed.