‘त्याच्यासोबत एकाच रूममध्ये राहायचं नव्हतं म्हणून…’; महाबळेश्वरच्या ट्रिप आधीच केतनला लोहगडा

पुणे: लोहगड किल्ल्यावरील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्याकांडाचा (Ketan Agarwal Death Case) तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतशी या गुन्ह्याची धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी पार्श्वभूमी समोर येत आहे. मुख्य आरोपी सिया गोयल हिने प्रियकर चेतन चौधरीच्या साथीने १८ जून रोजी केतनला (Ketan Agarwal Death Case) कड्यावरून ढकलून दिले होते. आता पोलीस कोठडीत सुरू असलेल्या चौकशीत सियाने दिलेली कबुली ऐकून पोलीसही चक्रावून गेले आहेत. सियाला केतनशी केवळ लग्नच टाळायचे नव्हते, तर त्याच्यासोबत एकाच रूममधील मुक्काम करणेही मान्य नव्हते. हा मुक्काम टाळण्यासाठी तिने थेट बालीचं प्री-वेडिंग फोटोशूट रद्द करण्यापासून ते थेट त्याचा काटा काढण्यापर्यंतची क्रूर मजल मारल्याचे तपासात उघड झाले आहे.(Ketan Agarwal Death Case)

Ketan Agarwal Death Case: वाढदिवसाचा मुक्काम टाळण्यासाठी आदल्याच दिवशी रचला मृत्यूचा सापळा!

मिळालेल्या माहितीनुसार, केतन आणि सिया यांच्या विवाहसोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली होती. लग्नाचे हॉल आणि इतर सर्व बुकिंग पूर्ण झाले होते. दरम्यान, १९ जून रोजी सियाचा वाढदिवस होता. आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस संस्मरणीय ठरवण्यासाठी केतनने महाबळेश्वर येथील एका आलिशान हॉटेलमध्ये खास सेलिब्रेशन आणि मुक्कामाचे (नाईट स्टे) नियोजन केले होते. मात्र, या ट्रिपदरम्यान केतनसोबत एकाच रूममध्ये राहावे लागेल या विचाराने सिया प्रचंड अस्वस्थ झाली होती. केतनसोबतचा हा मुक्काम कोणत्याही परिस्थितीत टाळायचा, याच एका विकृत हट्टापायी तिने वाढदिवसाच्या अवघ्या एक दिवस आधी, म्हणजेच १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर केतनचा गेम करण्याचा अंतिम कट प्रियकर चेतनच्या मदतीने अमलात आणला.

Ketan Agarwal Death Case:  ‘बाली’ दौरा फ्लॉप करण्यासाठी केतनचा पासपोर्ट थेट टॉयलेटमध्ये फेकला

पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत समोर आले की, केतनसोबत राहणे टाळण्याची सियाची ही पहिलीच वेळ नव्हती. याआधी ६ जून रोजी हे जोडपे प्री-वेडिंग फोटोशूटसाठी ‘बाली’ (इंडोनेशिया) येथे जाणार होते. विमानाची तिकिटे आणि हॉटेल बुकिंग सर्व काही निश्चित झाले होते. मात्र, बाली दौऱ्यात केतनसोबत राहावे लागेल या भीतीने सियाने एक कुटील डाव आखला होता. तिने केतनला सुगावा लागू न देता गुपचूप त्याच्या बॅगेतून त्याचा पासपोर्ट चोरला आणि मुंबईपुणे एक्सप्रेसवेवरील खालापूर फूड मॉलच्या स्वच्छतागृहात (टॉयलेट) फेकून दिला. पासपोर्ट अचानक गहाळ झाल्यामुळे केतनला बाली दौरा रद्द करावा लागला होता आणि सियाचा तो प्लॅन यशस्वी ठरला होता.

Ketan Agarwal Death Case: वाढलेल्या आत्मविश्वासाने घेतला केतनचा बळी

बाली दौरा यशस्वीपणे रद्द केल्यानंतर सियाचा आत्मविश्वास कमालीचा वाढला होता. मात्र, त्यानंतर लगेचच समोर आलेल्या महाबळेश्वरच्या मुक्काम टाळण्यासाठी तिच्याकडे दुसरा कोणताही मार्ग उरला नाही. अखेर, केतनसोबत एका खोलीत राहण्यापेक्षा तिने त्याला जगातूनच कायमचे हटवण्याचा सर्वात थरारक आणि भयानक मार्ग निवडला. लोणावळा ग्रामीण पोलीस या संपूर्ण धक्कादायक कबुलीनंतर न्यायालयासमोर पक्के पुरावे सादर करण्यासाठी पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

हेदेखील वाचा

Comments are closed.