स्वत: आमदार, कामगार सेना अध्यक्ष, मुलीला प्रभाग समिती, भावाला BEST, सचिन अहिरांकडे कोणती पदं?

मुंबई : ठाकरेंच्या शिवसेनेचे बडे नेते आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी नाट्यमयरित्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. सचिन अहिर हे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे निकटवर्तीय समजले जात होते. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा सर्वात मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. सचिन अहिर यांनी साथ सोडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मात्र त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सचिन अहिर आणि त्यांच्या कुटुंबीयांना आपल्या पक्षाने काय काय दिलं याचा पाढाच त्यांनी वाचून दाखवला.

Sachin Ahir Post In Shivsena : सचिन अहिर यांच्याकडे कोणती पदं?

  • स्वत: विधानपरिषद आमदार
  • भारतीय कामगार सेनेचं अध्यक्षपद
  • शिवसेनेत उपनेतेपद
  • मुलीला प्रभाग समिती
  • भावाला BEST समिती अध्यक्षपद

डॉन अरुण गवळीचे भाचे असलेले सचिन अहिर हे 1999 ते 2019 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते. या दरम्यान ते तीन वेळा विधानसभेत निवडून गेले होते. 2009 सालच्या आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदही मिळालं होतं. 2019 साली मात्र त्यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला.

आदित्य ठाकरे यांनी 2019 साली वरळीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सचिन अहिर यांना पक्षात महत्त्वाचं स्थान प्राप्त झालं. त्यावेळी त्यांना शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदाची संधी देण्यात आली. तसेच 2022 साली त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली.

Aaditya Thackeray On Sachin Ahir : आदित्य ठाकरे यांची टीका

सचिन अहिर यांनी पक्ष सोडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, त्यांना आम्ही सगळं काही दिलं, तरी अजून काय पाहिजे?सचिन अहिर यांची मुलीकडे प्रभाग समिती आहे. एनजीओच्या कोट्यातून त्यांना या समितीवर स्थान देण्यात आलं आहे. त्याचवेळी सचिन अहिर यांना बेस्ट अध्यक्षपद दिलं. त्यांच्या स्वतःकडे आमदारकी आहे. बरं, इतर लोक तक्रार करतात त्या प्रमाणे आमची भेट मिळत नाही असंही नाही. ते रोज मला भेटतात. मग अजून तुमच्यासाठी काय करायचं?

कुणी येण्याने किंवा कुणी जाण्यानं काही फरक पडत नाही, वरळी-शिवडी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तो तसाच राहणार, असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

ही बातमी वाचा:

Comments are closed.