विश्वचषकातून बाहेर, आता सुवर्ण पदकासाठी लढाई! एशियन गेम्ससाठी टीम इंडियाची घोषणा जाहीर, संघातून
टीम इंडिया स्क्वॉड महिला आशियाई गेम्स 2026 : महिला टी-20 विश्वचषक 2026 मधील निराशाजनक कामगिरीनंतर आता टीम इंडिया एका नव्या मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. जपानमध्ये होणाऱ्या आगामी एशियन गेम्स 2026 (Asian Games 2026) साठी भारतीय महिला क्रिकेट संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली निवड समितीने 15 सदस्यीय संघाची निवड केली असून, स्टार फलंदाज स्मृती मानधनाकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
सुवर्णपदक राखण्याची मोठी जबाबदारी
एशियन गेम्स 2026 मध्ये भारतीय महिला संघ डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून मैदानात उतरेल. 2023 मध्ये चीनच्या हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई खेळांच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव करत ऐतिहासिक सुवर्णपदक (Gold Medal) जिंकले होते. त्यामुळे यंदा कर्णधार हरमनप्रीत कौर आणि तिच्या ब्रिगेडवर हे सुवर्णपदक राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
8 देशांमध्ये खेळली जाणारी ही स्पर्धा टी-20 फॉर्मेटमध्ये होणार आहे. निवडकर्त्यांनी संघात अनुभवी खेळाडूंसोबतच अनेक नव्या आणि युवा चेहऱ्यांना संधी दिली आहे. स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर आणि यष्टिरक्षक ऋचा घोष यांना मुख्य फलंदाजी म्हणून संधी दिली आहे. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या जी. कमलिनी, भारती फुलमाळी, श्री चरणी, क्रांती गौड आणि नंदनी शर्मा या युवा खेळाडूंना संघात स्थान देऊन मोठा विश्वास दाखवण्यात आला आहे.
🚨 बातम्या 🚨
2026 साठी भारतीय महिला संघाची घोषणा #AsianGames सप्टेंबर मध्ये.
अधिक तपशील ▶️ https://t.co/JagEsizajH#TeamIndia pic.twitter.com/jJGddVSr17
— BCCI महिला (@BCCIWomen) 30 जून 2026
श्रेयांका पाटीलच्या निवडीवर सस्पेंस
फिरकी अष्टपैलू खेळाडू श्रेयांका पाटीलचा 15 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे, मात्र तिची निवड पूर्णपणे तिच्या फिटनेस क्लिअरन्सवर (Fitness Clearance) अवलंबून असेल. मेडिकल टीमने हिरवा कंदील दाखवल्यानंतरच ती जपानला रवाना होऊ शकेल.
यास्तिका भाटिया बाहेर….
या स्पर्धेत भारतीय संघाचा भाग असलेली यष्टीरक्षक-फलंदाज यास्तिका भाटिया ही आशियाई खेळांसाठी निवडलेल्या संघात स्थान न मिळालेली एकमेव खेळाडू आहे. तिच्या जागी जी. कमलिनी यांची निवड झाली आहे.
सामने केव्हा आणि कुठे होणार?
जपानच्या आयची-नागोया येथे होणाऱ्या या आशियाई खेळांमधील महिला क्रिकेट स्पर्धा 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2026 या कालावधीत खेळवली जाईल. हे सर्व हाय-व्होल्टेज सामने नागोयाच्या देखण्या ‘कोरोजी स्पोर्ट्स पार्क’ येथे होणार आहेत.
एशियन गेम्स 2026 साठी संपूर्ण भारतीय संघ (Team India Squad Women Asian Games 2026) :
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), जी. कमलिनी (विकेटकीपर), भारती फुलमाळी, श्री चरणी, रेणुका ठाकूर सिंग, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी, श्रेयांका पाटील*, राधा यादव आणि नंदनी शर्मा.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
Comments are closed.