पतीकडून आयुष्याचा शेवट, ‘त्या’ पत्नीला अटक करा अन्यथा आत्मदहन करू; मयताच्या कुटुंबियांचा इशारा
नाशिक गुन्हे: नाशिकच्या मालेगाव कॅम्प भागातील साने गुरुजी नगरात अनिकेत बाळासाहेब जगताप (वय 27) या तरुणाने केलेल्या आत्महत्येप्रकरणी कॅम्प पोलिसांनी तपास करत पत्नीसह सासू-सासरे व मामेसासू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, अनिकेतचे वडील बाळासाहेब जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कॅम्प पोलिसांनी अनिकेतचा मानसिक छळ केल्याप्रकरणी पत्नी श्रुती जगताप, सासू वंदना सुभाष धिवरे, सासरे सुभाष सुकदेव धिवरे आणि मामे सासू उज्वला सतीश पवार (सर्व रा. पंचशील नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सासू आणि सासरे यांना पोलिसांनी अटक केली असून पत्नी श्रुती आणि मामेसासू उज्वला पवार हे फरार झाले आहेत. श्रुतीला आणि मामे सासूला तत्काळ अटक करा अन्यथा आत्मदहन करू असा इशारा मयत अनिकेच्या कुटुंबीयांनी दिला आहे.
वर्षभरापूर्वी झाला होता विवाह
अनिकेत जगताप याचा वर्षभरापूर्वी पंचशील नगरातील श्रुती धिवरे हिच्याशी विवाह झाला होता. मात्र, विवाह झाल्यापासूनच दोघांमध्ये सतत वाद होत होते. श्रुती ही नांदायला येत नव्हती तसेच तिने अनिकेतविरुद्ध पोलिसात तक्रार केल्याने तो गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावाखाली होता. याच त्रासाला कंटाळून अखेर त्याने टोकाचे पाऊल उचलत राहत्या घरात गळफास घेतल्याचा आरोप अनिकेतच्या कुटुंबीयांनी केला आहे.
विषबाधेमुळे पत्नीचा मृत्यू, पती गंभीर
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली. बागलान तालुक्यातील आखतवाडे गावामध्ये मटणाचं जेवण एका शेतकरी दाम्पत्याच्या चांगलंच जीवावर बेतलं. रविवारी रात्री मटणाचं जेवण आणि त्यानंतर दही खाल्ल्यानंतर या वृद्ध दाम्पत्याची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान 68 वर्षीय द्वारकाबाई शांताराम ह्याळीज यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण आखतवाडे गावावर आणि नाशिक परिसरात शोककळा पसरली आहे. तर दुसरीकडे 78 वर्षीय शांताराम ह्याळीज यांच्यावर मालेगाव येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून ते सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
नेमकी विषबाधा मटणामुळे झाली की दह्यामुळे, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अनेकदा मटण आणि दही एकत्र खाल्ल्याने किंवा अन्न शिळे असल्यास फूड पॉयझनिंग (Food Poisoning) होण्याचा धोका असतो. मात्र, या प्रकरणातील नेमकी विषबाधा कशामुळे झाली, हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Comments are closed.