मुंबईत हिट अँड रनचा थरार! जोगेश्वरीत मद्यधुंद टँकरचालकाने डिलिव्हरी बॉयला चिरडलं; जागेवरच प्राण

मुंबई (जोगेश्वरी): मुंबईतील जोगेश्वरी भागात मध्यरात्री हिट अँड रनची एक थरारक आणि अत्यंत दुर्दैवी घटना (Mumbai Hit And Run) समोर आली आहे. एका भरधाव टँकर चालकाने दुचाकीवरून जाणाऱ्या डिलिव्हरी बॉयला जोरदार धडक (Mumbai Hit And Run) दिली. या भीषण अपघातात डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू (Mumbai Hit And Run) झाला आहे. अपघात झाल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या टँकर चालकाला स्थानिक नागरिकांनी पाठलाग करून पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.(Mumbai Hit And Run)

Mumbai Hit And Run:  अजित ग्लास गार्डन समोरील घटना

हर्ष असे अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना रात्री सुमारे १:२० वाजण्याच्या सुमारास जोगेश्वरी पश्चिमेकडील अमृत नगर भागातील अजित ग्लास गार्डन गेटसमोर घडली. भरधाव टँकरने हर्षच्या दुचाकीला भीषण धडक दिली.

Mumbai Hit And Run:  टँकर चालक मद्यधुंद अवस्थेत?

हा अपघात इतका भीषण होता की हर्षचा यामध्ये जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर टँकर चालकाने तिथे थांबण्याऐवजी टँकरसह घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्रीच्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत टँकरचा पाठलाग केला आणि चालकाला रंगेहाथ पकडले. टँकर चालक पूर्णपणे मद्यधुंद (दारूच्या नशेत) असल्याचा प्राथमिक दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. संतप्त नागरिकांनी त्याला पोलिसांच्या हवाली केले.

Mumbai Hit And Run:  ओशिवरा पोलिसांत गुन्हा दाखल

घटनेची माहिती मिळताच ओशिवरा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हर्षचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी निष्काळजीपणे आणि मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील सखोल तपास सुरू केला आहे.

आणखी वाचा  –

Ketan Agrawal Case : केतनला संपवण्याच्या कटाची ‘त्या’ तिसऱ्या तरुणाला पूर्ण कल्पना! चेतनच्या मित्राला पुणे पोलिसांनी उचललं, बीड कनेक्शन उघड, त्याने…

Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case: केतन अग्रवाल प्रकरणात बीडमधील तरुणाची एन्ट्री; लोहगडावरुन ढकलून दिल्यानंतर सिया आणि चेतन पहिले त्याला भेटले-बोलले!

Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case Pune: सिया आणि चेतनची आज कोठडी संपणार; पोलीस कोर्टात नसरापूरप्रकरणातील ती थिअरी मांडणार, संपूर्ण राज्याचं लक्ष

हेदेखील वाचा

Comments are closed.