पैसे काढण्यापासून बिल भरेपर्यंत ATM चे अनेक फायदे

जर तुम्ही पण एटीएमचा उपयोग फक्त पैसे काढण्यासाठी करत असाल आणि इतर कामांसाठी बँकेबाहेर रांगा लावत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण पैसे काढण्याबरोबरच एटीएमचा उपयोग इतर अनेक गोष्टींसाठीही होतो. मात्र अनेकांना हे माहीत नसते. कोणती आहेत ही कामे ते बघूया.

पिन बदलणे-एटीएम कार्डचा उपयोग पिन क्रमांक जनरेट करण्याबरोबरच तो बदलण्यासाठीही होतो. त्यामुळे बँकेत खेपा घालायची गरज नसते.

मिनी स्टेटमेंट- एटीएम मशीनमधून तुम्ही तुमच्या अकाऊंटमधील ट्रान्झेक्शनची मिनी स्टेटमेंटही घेऊ शकता. त्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही.

बँलेन्स चेक- एटीएमच्या मदतीने अकाऊंटमध्ये किती बँलन्स शिल्लक आहे हे देखील तुम्ही तपासू शकता. त्यासाठी बँकेत जाऊन पासबुक भरण्याचीही गरज नसते.

लाईट , गॅस, बील- जवळपास सर्वच एटीएम मशीनवर हल्ली लाईट बिल, गॅस, बिल भरण्याची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी एटीएम मशीनमधील पे युटीलिटी बिल्स ऑप्शनवर क्लिक करून पेमंट करता येते.

मोबाईल रिचार्ज- तुमचा किंवा कुटुंबातील कोणाही सदस्याचे प्री पेड मोबाईल रिचार्ज तुम्ही एटीएमने करू शकता.

क्रेडीट कार्ड पेमेंट- तुमच्या के्रेडीट कार्डचे बिलही तुम्ही एटीएमने भरु शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डचा वापर करावा लागेल. त्यातून बिलाची रक्काम वजा केली जाते आणि तुम्हाला पावती मिळते. पण जर तुमचे क्रेडीट आणि डेबिट कार्ड एकाच बँकेचे असेल तरच ही सेवा मिळते.

चेक बुक रिकवेस्ट-जर तुमचे चेक बुक संपले असेल आणि तुम्हाला रिप्रिंटची रिक्वेस्ट करायची असेल तर ते ही एटीएम कार्डद्वारे करता येते.

पैसे डिपॉझिट- हल्ली एटीएम सेंटर्समध्येही पैसे डिपॉझिट करण्याची व्यवस्था असते. त्यासाठी एटीएम कार्डचा उपयोग होतो.

या आणि अशा बँकेशी जोडलेल्या अनेक सुविधा तुम्हाला एटीएम कार्डचा वापर करून घेता येतात.

Comments are closed.