माझ्या कपड्यावरुन समजून जा, मलाच ग्रीन सिग्नल, पालकमंत्री पदाबाबत गोगावलेंचं मोठं वक्तव्य

Bharat Gogawale : महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून रायगडच्या पालकमंत्रीपदाचा पेच कायम आहे. रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेसला द्यायचं की राष्ट्रवादी काँग्रेसला द्यायचं यावरुन जिल्ह्यातील नेत्यांमध्ये कुरबूर सुरु आहे. अशातच रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मला पालकमंत्री पदाचा ग्रीन सिग्नल आहे. कागदोपत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लवकरच घोषित करतील असं वक्तव्य गोगावले यांनी केलं आहे. त्यामुळं 15 ऑगस्ट अगोदर गोगावलेंना पालकमंत्री पद निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मलाच रायगडचे पालकमंत्री पद मिळेल

महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून रखडलेल्या रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मंत्री भरत गोगावले यांनी मोठ विधान केलं आहे. रायगडचे पालकमंत्री आपणच आहोत. पालकमंत्री पदाबाबत मला कधीच ग्रीन सिग्नल मिळाला असल्याचे गोगावले म्हणाले. त्यामुळेच मी आज हिरवा सदरा देखील घातला असून यावरुन तुम्ही समजून जा मलाच रायगडचे पालकमंत्री पद मिळेल असं मिश्किल भाष्य गोगावले यांनी केलं. रायगडच्या पालकमंत्री पदावर अखेर शिक्कामोर्तब केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे लवकरच अधिवेशन संपल्यावर याबाबत कागदोपत्री घोषित करतील असं देखील गोगावलेंनी म्हटलंय. पुढील 15 दिवसांच्या आत आणि 15 ऑगस्टच्या मला पालकमंत्री पद मिळेल असं देखील गोगावले म्हणाले.

गेल्या काही काळापासून रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत रस्सीखेच सुरु

गेल्या काही काळापासून रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत रस्सीखेच सुरु आहे. याआधी अनेकदा शिवसेनेच्या नेत्यांनी भरत गोगावलेंकडे रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान, मंत्री भरत गोगावले, राष्ट्रवादीचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा देखील झाली होती. यात भरत गोगावलेंकडे पालकमंत्रीपद देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली होती. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. आता लवकर याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण मंत्री भरत गोगावे यांनी तसे संकेत दिले आहे. माझ्या कपड्यावरुन सजमू जा, मलाच ग्रीन सिग्नल आहे असे सूचक वक्तव्य गोगावले यांनी केलं आहे. भरत गोगावले यांनी आज हिरव्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. यावरुन त्यांनी माझ्या कपड्यावरुन समजून जा असं वक्तव्य केलं आहे. मलाच पालकमंत्रीपद मिळणार असल्याचे भरत गोगावले यावेळी म्हणाले.

Comments are closed.