मोठी बातमी: अखेर तो क्षण आला! वैभव सूर्यवंशीचं इंग्लंडविरुद्ध T20 क्रिकेटमध्ये पदार्पण, सचिनचा
वैभव सूर्यवंशीने टीम इंडियासाठी टी20 मध्ये पदार्पण केले: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज 4 जुलै 2026 रोजी मँचेस्टरच्या ऐतिहासिक ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळवला जात आहे. पहिल्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे कोणताही निकाल लागू शकला नव्हता. दरम्यान, दुसऱ्या सामन्यात भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक सर्वात सुवर्ण आणि ऐतिहासिक क्षण आज मँचेस्टरच्या मैदानावर पाहायला मिळत आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) याने भारतीय संघात स्थान मिळवले असून तो आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण (T20I Debut) करत आहे. या पदार्पणासोबतच वैभव सूर्यवंशी हा भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू (Youngest Indian International Cricketer) बनला आहे.
कॅप क्रमांक १२२ ❤️
एक ऐतिहासिक क्षण – वैभव सूर्यवंशी यांनी सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला…!!! pic.twitter.com/f47aFqJV1e
– जॉन्स. (@CricCrazyJohns) 4 जुलै 2026
सचिनचा रेकॉर्ड मोडत इतिहासाच्या पानावर कोरलं नाव (Vaibhav Sooryavanshi his T20I debut for Team India)
वैभवने आज मैदानात पाऊल टाकताच अनेक दशकांपूर्वीचे विक्रम मोडीत काढले आहेत. भारतासाठी सर्वात तरुण वयात पदार्पण करण्याचा विक्रम यापूर्वी महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांच्या नावावर होता. वैभवने अवघ्या 15 व्या वर्षी हा मान मिळवून भारतीय क्रिकेटमध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात केली आहे.
EMOTIONAL VAIBHAV SOORYAVANSHI AFTER RECIEVING THE INDIA CAP 🥹❤️ pic.twitter.com/OtevdCIy3d
– जॉन्स. (@CricCrazyJohns) 4 जुलै 2026
आयपीएल 2026 मधील ऐतिहासिक कामगिरी (Vaibhav Sooryavanshi News)
आयपीएल 2026 चा हंगाम राजस्थान रॉयल्सच्या अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) याने पूर्णपणे गाजवला. टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील एका फलंदाजाची ही सर्वात स्फोटक आणि ऐतिहासिक कामगिरी मानली जात आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी वयात (15 वर्षे) सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप जिंकण्याचा अभूतपूर्व पराक्रम त्याने केला. 16 सामन्यात त्याने 776 धावा केल्या. त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध अवघ्या 35 चेंडूंत शतक ठोकले. हे आयपीएल इतिहासातील दुसरे सर्वात वेगवान शतक आहे. तसेच तो टी-20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला.
टिळक वर्मा यांनी वैभव सूर्यवंशी यांना भारताची टोपी दिली 🔥 pic.twitter.com/buvpWTXZOC
– जॉन्स. (@CricCrazyJohns) 4 जुलै 2026
हे ही वाचा –
Comments are closed.