आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करणारे 7 खेळाडू! वैभव सूर्यवंशी कितव्या स्थानी?
वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi Made his T20 debut against England) 4 जुलै रोजी इंग्लंडविरुद्ध आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली आहे. वयाच्या अवघ्या 15 वर्षे 99 दिवसांत पदार्पण करून त्याने भारतासाठी एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. मात्र, जागतिक क्रिकेटचा इतिहास पाहिला तर काही खेळाडूंनी त्याच्यापेक्षाही कमी वयात आपापल्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.
सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा विक्रम पाकिस्तानच्या हसन रजाच्या नावावर आहे. 1996 मध्ये त्यांनी वयाच्या 14 वर्षे 227 दिवसांत कसोटी (Test) क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. याच्या अवघ्या 6 दिवसांनंतर, त्यांनी जिम्बाब्वेविरुद्ध वयाच्या 14 वर्षे 233 दिवसांत एकदिवसीय (ODI) सामन्यातही पदार्पण केले. आता या यादीत वैभव सूर्यवंशी दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारे टॉप-7 खेळाडू!
हसन रजा (पाकिस्तान): 14 वर्षे 227 दिवस
वैभव सूर्यवंशी (भारत): 15 वर्षे 99 दिवस
मोहम्मद शरीफ (बांगलादेश): 15 वर्षे 116 दिवस
मोहम्मद मुश्ताक (पाकिस्तान): 15 वर्षे 124 दिवस
आकिब जावेद (पाकिस्तान): १६ वर्षे १२७ दिवस
सचिन तेंडुलकर (भारत): 16 वर्षे 205 दिवस
शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान): 16 वर्षे 215 दिवस
हसन रजाचा विक्रम भविष्यात मोडणे आता अशक्य आहे. याचे कारण म्हणजे, 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) एक नवीन नियम लागू केला आहे. या नियमानुसार, 15 वर्षांपेक्षा कमी वयाचा कोणताही खेळाडू आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकत नाही.
Comments are closed.