एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, एक दिवस आराम करणार, मंगळवारी डिस्चार्ज?
मराठी Health Update ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल (शनिवारी) रात्री आठ वाजल्यापासून जुपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांचा उद्या दिवस देखील हॉस्पिटलमध्ये राहण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. उद्याचा दिवस एकनाथ शिंदे विश्रांती घेतील, त्यांना मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाऊ शकतो, अशी माहिती आहे. मात्र, त्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ताप आणि अशक्तपणा जाणवत असल्याने ठाण्याच्या जुपिटर रुग्णालयात काल (शनिवारी) दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे उद्याच्या दिवशी म्हणजेच सोमवारी देखील हॉस्पिटलमध्ये राहण्याची शक्यता आहे. शिंदे यांना ताप आला असून प्रचंड अशक्तपणा असल्याने त्यांना अजून एक दिवस आराम करण्याचा कुटुंबाचा आणि डॉक्टरांचा सल्ला असल्याची माहिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे उद्या देखील हॉस्पिटलमध्ये आराम करतील. परवा त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे, शक्यता आहे. मंगळवारी त्यांना डिस्चार्ज मिळेल, अशी माहिती आहे पण त्याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
एकनाथ शिंदे यांना डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला : आरोग्यमंत्र्यांची माहिती
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. शिंदे साहेबांना धावपळीमुळे त्रास होत असल्याने डॉक्टरांना त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.शिंदे साहेब हे ऐकणारे नाहीत. मात्र त्यांना सध्या आरामाची गरज आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पंढरपुरात दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याच बाबत एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीची माहिती आरोग्य मंत्री म्हणून प्रकाश आबिटकर यांनी पंढरपुरात दिली.
बच्चू कडू काय म्हणाले?
शिवसेनेचे आमदार बच्चू कडू म्हणाले की खरंतर मी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून पाहतो की सारखी गर्दी असते. एखाद्या सामान्य कार्यकर्त्यांना भेटायचं म्हटलं तरी शिंदे साहेब सहज उपलब्ध होतात आणि बारा -एक -दोन वाजेपर्यंत कार्यकर्त्यांना भेटतात. एवढा प्रचंड संपर्क त्यांनी ठेवला आहे, आम्ही नेहमी म्हणतो की यात थोडा तरी बदल केला पाहिजे, स्वतःसाठी जगलं पाहिजे, शरीराच्या अडचणी वाढत जातील. ते 24 तास कामात राहणारे व्यक्ती आहेत. त्यांनी स्वतःची तब्येत स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. एकनाथ शिंदे यांनी लवकर बरे व्हावे आणि पुन्हा लोकांच्या सेवेत रुजू व्हावे अशी प्रार्थना करतो, असं बच्चू कडू यांनी म्हटलं.
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Comments are closed.