सचिन अहिर फुटल्यानंतर उद्धव ठाकरे कमालीचे सावध, पक्षातील सर्व आमदारांना आदेश धाडला; मंगळवारी मा

उद्धव ठाकरे: महाराष्ट्राच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खासदार आणि आमदारांच्या लागोपाठ होत असलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पक्षाच्या सर्व आमदारांची पुन्हा एकदा तातडीची बैठक बोलावली आहे. येत्या मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’ (Matoshree) या निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे.

विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी नुकतीच उद्धव ठाकरेंची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या मोठ्या धक्क्यानंतर आता आणखी आमदार फुटतील का? अशी शक्यता वर्तवली जात असतानाच उद्धव ठाकरेंनी ही बैठक बोलावल्याने राजकीय वर्तुळात या बैठकीला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे.

Uddhav Thackeray: ‘मातोश्री’वरील बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा?

मंगळवारी संध्याकाळी होणाऱ्या या महत्त्वाच्या बैठकीत अनेक संवेदनशील आणि धोरणात्मक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. खासदारांचा फुटीनंतर आमदारांच्या फुटीबाबत सुरू असलेल्या चर्चा, पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आणि आमदारांचा विधिमंडळातील परफॉर्मन्स याबाबत चर्चेची शक्यता वर्तवली जात आहे.

Uddhav Thackeray: 6 खासदार आणि सचिन अहिरांच्या बंडानंतर ठाकरे गट सावध

शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती, ज्याने पक्षाला मोठा धक्का बसला होता. या खासदार फुटीनंतर आता एकनाथ शिंदे (मराठी) यांचा डोळा ठाकरेंच्या उरलेल्या आमदारांवर आणि नगरसेवकांवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे अत्यंत सावध पावले टाकत आहेत.

Sanjay Raut: काँग्रेस आमदाराला शिंदे गटाची ऑफर; संजय राऊतांचा दावा

दरम्यान, महाविकास आघाडीतील (MVA) आणखी एक आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. विधान परिषदेतील काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांना शिंदे गटाकडून 20 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली असून, आगामी विधानसभा निवडणुकीत आमदारकी देण्याचे आश्वासनही देण्यात आल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला. त्यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Sachin Ahir: मी आदित्य ठाकरेंना नेहमी सांगायचो, आपली मतं शिंदेंकडे चाललेत, आपण फिरलं पाहिजे: सचिन अहिर

Sunil Shinde and Sahin Ahir: तुमच्याआधी सुनील शिंदे ठाकरे गटातून बाहेर पडणार होते का? प्रश्न ऐकताच सचिन अहिर सावधपणे म्हणाले…

Comments are closed.