आई जेवायला देत नाही, रोज मारते, गळाही दाबला; चिमुकल्याचं बोलणं ऐकून ठाण्यातील शिवसेना शाखेतील स

ठाणे: ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. किसन नगर येथील एका साडेतीन वर्षांच्या निष्पाप चिमुकल्यावर (Thane Crime News) त्याच्याच सख्ख्या आईने अमानुष अत्याचार (Thane Crime News) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. “मम्मी मला रोज मारते, जेवायला देत नाही आणि तिने मला गरम चाकूने चटके दिले,” अशी विदारक व्यथा या चिमुकल्याने मांडल्यानंतर (Thane Crime News) संपूर्ण ठाणे जिल्ह्यात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी तात्काळ कारवाई करत नराधम आईला ताब्यात घेतले आहे.(Thane Crime News)

Thane Crime News:   शिवसेना मध्यवर्ती शाखेत उघड झाला प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, किसन नगर येथील शाळा क्रमांक ३ मध्ये शिकणारा हा साडेतीन वर्षांचा बालक काल दुपारी आपल्या आजीसोबत वागळे इस्टेट येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेत पोहोचला. चिमुकल्याच्या (Thane Crime News) अंगावरील जखमा आणि त्याच्या पाठीवर, हाता-पायांवर असलेले चटके पाहून तेथील उपस्थित सुन्न झाले. शिवसेना शाखाप्रमुख सुनील मोरे यांनी बालकाची विचारपूस केली असता, त्याने आईने केलेल्या छळाची धक्कादायक माहिती दिली. यानंतर सुनील मोरे यांनी तातडीने बालकाला जवळच्या रुग्णालयात नेऊन त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू केले.(Thane Crime News)

Thane Crime News:  “मम्मीने गळा दाबला, माझा दम गुदमरला…”

रुग्णालयात उपचार घेत असताना त्या साडेतीन वर्षांच्या चिमुरड्यानेआपल्यावर झालेला अत्याचार सांगितला. तो म्हणाला, “मम्मीने मला गरम गरम चाकूने चटके दिले. ती मला रोज मारते आणि लाथा बुक्क्यांनी तुडवते. ती मला जेवायलाही देत नाही; आजीकडून जेवण घे, माझ्या घरी जेवण नाही असं सांगते. तिने माझ्या पाठीवर मारलं आणि एका दिवशी माझा गळा इतका जोरात दाबला की माझा दम घुटू लागला होता.” या निष्पाप बालकाच्या तोंडून हे ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले.

Thane Crime News:  शिवसेना पदाधिकाऱ्यांची धाव; आरोपी आई पोलिसांच्या स्वाधीन

घटनेचे गांभीर्य ओळखून शिवसेना शाखाप्रमुख सुनील मोरे यांनी महिला पदाधिकाऱ्यांसह तात्काळ संबंधित महिलेचे घर गाठले. तिला जाब विचारल्यानंतर, महिला पदाधिकाऱ्यांच्या मदतीने तिला वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांनी या अमानुष कृत्याची गंभीर दखल घेत पीडित बालकाच्या नातेवाईकांच्या मदतीने गुन्हा दाखल केला असून, आरोपी आईला अटक केली आहे.

हेदेखील वाचा

Comments are closed.