7 सप्टेंबरला ठाकरेंचे 15 आमदार जाणार, हिंदुस्थानी भाऊचा खळबळजनक दावा, तर…

Hindustani Bhau Warns Uddhav Thackeray: अयोध्येथील (Ayodhya) श्रीराम मंदिरातील (Shri Ram Mandir) दान चोरीच्या विरोधात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना आक्रमक झालीय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Party) ‘रामरक्षा आंदोलन’ (Ram Raksha Aandolan) करण्यात आलं. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर (BJP) निशाणा साधला. आपण कट्टर कडवट देशाभिमानी हिंदू आहोत. आम्ही हिंदू भोळे आहोत, भाबडे आहोत पण मूर्ख नाही आहोत, तुम्ही आमचं धनुष्यबाण चोरलं, पण हनुमानाच्या मशालीनं जशी रावणाची लंका जाळली तीच मशाल आज आमच्या हाती असून या मशालीनंच आम्ही अन्यायाची लंका जाळणार, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावलंय. अशातच आता रिलस्टार हिंदुस्थानी भाऊ यानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करुन ठाकरेंना एक सल्ला दिला आहे. तसेच, संजय राऊतांना ‘भांडुपचा खोटा अनिल कपूर’, अंस म्हणत टोला लगावला आहे.

हिंदुस्थानी भाऊ नेमकांचा मुलगा? (उद्धव ठाकरेंवर हिंदुस्थानी भाऊ)

बिग बॉस फेम रिलस्टार हिंदुस्थानी भाऊ यानं आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर केलाय. त्या व्हिडीओमध्ये उद्धव ठाकरेंना उद्देशून हिंदुस्थानी भाऊनं इशारा दिलाय. तसेच, संजय राऊतांनाही टोले लगावले आहेत. हिंदुस्थानी भाऊ व्हिडीओमध्ये म्हणाला की, “उद्धव साहेब, जय महाराष्ट्रजय श्रीराम, माहितीय ना? मी मध्ये बोललेलो, सांभाळा नाहीतर पंधरा आमदार आणि पंचवीस नगरसेवक जायच्या मागे आहेत… सचिन भाऊ अहिर पहिला बॉम्ब फुटला आणि सप्टेंबरपर्यंत खूप काही जाणार आहे. सप्टेंबर सात तारीख, आठवण ठेवा ही तारीख, खूप काही जाणार आहे” असं हिदुस्थानी भाऊ उद्धव ठाकरेंना म्हणाला.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हिंदुस्थानी भाऊनं संजय राऊत यांचा उल्लेख ‘भांडुपचा खोटा अनिल कपूर’ असा केलाय. तो म्हणालाय की, “तुमचा अनिल कपूर काय बोलतो? आता ‘तुडवा ऑपरेशन’ चालू करणार… ‘तुडवा ऑपरेशन’ चालू करणार? अरे, सचिन भाऊ अहिर कोण आहे? दगडी चाळचं नाव ऐकलंय. ऐकलंय ना? सात रस्ता, दगडी चाळ, अरूण भाई गवळी उर्फ डॅडी… बाळासाहेब काय बोलायचे माहितीय ना? तुमच्याकडे दाऊद आहे, तर आमच्याकडे गवळी आहे… हा तेच ते अरुण भाई गवळी… हा भांडुपचा खोटा अनिल कपूर आहे ना, याला आता तरी तोंड बंद करायला सांगा… नाही तर ह्याचा ‘तुडवा ऑपरेशन’ चालू होईल… जय श्री राम… जय शंभू नारायण…”

दरम्यान, ऑपरेशन टायगरमुळे घरघर लागलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं रामरक्षा आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा हिंदुत्त्वाच्या मुद्दयाला हात घातलाय. बंडखोरीच्या गर्तेत अडकलेल्या उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावलेली. मातोश्रीवर बोलावलेल्या या बैठीकीला संजय राऊतांसह  राहुल पाटील वगळता सर्व आमदारांनी हजेरी लावलेली. आमदार राहुल पाटील यांच्या घरी कार्यक्रम असल्यानं ते परभणीत असल्याचं त्यांनी उद्धव ठाकरेंना कळवल्याची माहिती आहे. सचिन अहिर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. राम मंदिरातील दानचोरीच्या विरोधात रामरक्षा आंदोलन करण्याच्या आमदारांच्या बैठकीत सूचना देण्यात आल्यात. अधिवेशन संपल्यानंतर पुढील आठवड्यात नागपूरमध्ये संघाच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन  होणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Dhanashri Kadgaonkar Stuck Mumbai Pune Expressway Traffic: ‘मासिक पाळी आलेली, वॉशरुमलाही जाणं शक्य नव्हतं’; मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 9 तास अडकलेल्या मराठी अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग

Comments are closed.