तुकाराम मुंढेंची आणखी एक धडक कारवाई, प्रसिद्ध स्वीट्स कारखान्यात मेलेला उंदीर, कारवाई होणार
तुकाराम मुंढेंचा नागपूर मिठाई दुकानावर छापा अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी गेल्या काही काळापासून भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात धडक मोहिम सुरू केलीये. त्यांनी आतापर्यंत अनेक कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश केला. तसेच कंपन्यांचे नियमांचे उल्लंघन उघडकीस आणले. नुकतंच, तुकाराम मुंढे यांच्या एफडीए विभागाने नागपूरातील प्रसिद्ध मिष्ठान भंडार ‘श्री हीरा स्वीट्स’मध्ये (Shri hari Sweets) धडक कारवाई केली. किचनची तपासणी केली असता तिथे टीमला चक्क मेलेले उंदिर सापडले. यानंतर “श्री हीरा स्वीट्स” वर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कारवाईचा बडगा उगारला.
श्री हीरा स्वीट्स’मध्ये मेलेले उंदीर आढळले (Tukaram Mundhe Raids in Nagpur Sweet Shop)
मिळालेल्या माहितीनुसार, 3 जुलै रोजी एफडीएने ‘श्री हीरा स्वीट्स’च्या पाचपावली परिसरातील कारखान्यातील किचनची पाहणी केली होती. त्यात अनेक त्रुटी आढळले. मुख्य म्हणजे चक्क मेलेले उंदीर आढळले. याशिवाय किचनमध्ये धुळीचं साम्राज्य, घाण आणि काही भांड्यांना गंज लागले असल्याचं दिसून आलं. यासह लोखंडी पत्र्यांवर गंज तसेच स्वच्छतेशी संबंधित इतर त्रुटीही निदर्शनास आल्या होत्या.
त्यावेळी तात्काळ कारवाई करत एफडीएने तिथे सुरू असलेले उत्पादन थांबवले होते. तसेच “श्री हीरा स्वीट्स”च्या कारखान्याचा परवाना सुद्धा निलंबित करण्यात आला आहे. एफडीएच्या निर्देशानुसार,या कंपनीला उत्पादन युनिटमधील नमूद करण्यात आलेल्या त्रुटी दूर कराव्या लागतील. त्यानंतर कंपनी अपील करू शकते. त्याच्या अपीलवर एफडीएच्या आयुक्तांकडे सुनावणी होईल, पुन्हा तपासणी करण्यात येईल. आवश्यक सुधारणा झाल्याचे आढळल्यानंतर नियमानुसार परवाना निलंबन मागे घेतले जाऊ शकते, अशी माहिती एफडीएकडून देण्यात आली आहे.
पाकिस्तानमध्ये निर्मित होणाऱ्या गोरी ब्युटी क्रीमवर कारवाई
अन्न आणि औषध प्रशासन विभागाने नागपूरमध्ये जप्त केलेल्या गोरी ब्युटी क्रीमचे मुंबई येथील प्रयोगशाळेत तपासणीला पाठवले होते. दरम्यान, याचा धक्कादायक अहवाल आता समोर आला आहे. गोरी ब्युटी क्रीममध्ये अधिक प्रमाणात पारा आणि शिसे आढळल्याचे अन्न आणि औषध प्रशासन विभागाने नुकत्याच प्राप्त झालेल्या अहवालातून पुष्टी केली आहे. अहवालातून समोर आले की, गोरी ब्युटी क्रीममध्ये 11 हजार 991 पीपीएम पाराचे प्रमाण आढळले आहे. तर, शिसेचे प्रमाण 3.2 पीपीएम आढळले आहे. हे मर्यादेपेक्षा चार पट अधिक असल्याचे विभागाने सांगितले. दरम्यान, ही माहिती उघड होताच, अन्न आणि प्रशासन विभागाने गोरी ब्युटी क्रीमच्या विक्रीवर प्रतिबंध लावले आहे. या क्रीमची निर्मिती पाकिस्तानमध्ये होत असल्याची माहिती आहे. अवैध पद्धतीने भारतात त्याची विक्री केली जाते. या क्रीमच्या वापराणे अनेक महिलांना किडनीचे विकार झाल्याची माहिती समोर आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Comments are closed.